या व्यवहारी जगात लहानसहान आर्थिक अडचणींमुळे मोठं नुकसान सोसावं लागतं. अनेकदा आपल्याला काही वैयक्तिक कारणास्तव अल्पावधीसाठी पैशांची गरज असते. मात्र वेळीच पैसे न मिळाल्याने मोठे नुकसान सोसावे लागते. पण आता नाही! तुमची हीच गरज लक्षात घेऊन श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी तुम्हाला उपलब्ध करून देते अल्प व दीर्घ काळासाठी वैयक्तिक कर्ज. हे कर्ज देखील कमीत कमी कागदपत्रात तात्काळ मंजूर करून दिले जाते. ज्यामुळे वेळीच तुमची गरज पूर्ण होते! तुमच्या वैयक्तिक गरजांना आम्ही देऊ आधार! वैयक्तिक कर्जाबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.
व्यवसाय म्हटला की हाताशी भांडवल हवं असतं, मात्र या व्यवहाराच्या जगात अडकलेले पैसे वेळेवर मिळतीलच याची खात्री नाही. श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटीच्या वतीने तुम्हाला व्यवसायिक कर्ज तात्काळ उपलब्ध करून देण्याची हमी आम्ही देतो. व्यवसाय छोटा असो किंवा मोठा, तुमच्या गरजेच्या वेळी संस्था देईल तुम्हाला त्वरित आणि तात्काळ कर्ज, कारण आम्ही जाणतो व्यवसायात वेळीच भांडवल गुंतवले तरंच फायद्याची हमी असते.
तुम्ही जर एक व्यावसायिक असाल आणि तुम्हाला काही कालावधीसाठी पैशांची गरज असेल तर व्यावसायिक कर्जासाठी किंवा त्याबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.
आपल्या तात्काळ गरजा भागवणं असो किंवा आपली छोटी-मोठी स्वप्नं असोत, पैसा हाताशी हवाच असतो. परंतु सर्वसामान्य नोकरदार बंधूंना आपल्याच कामाच्या पैशांसाठी अर्थात पगारासाठी महिनाभर वाट पाहावी लागते. गरजेच्या वेळी हाताशी पैसे नसल्यास मोठी तारांबळ होते. अशा वेळी तुम्हाला साथ देते श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी! आम्ही जाणतो तुमच्या स्वप्नांचं आणि गरजांचं महत्व आणि म्हणूनच संस्था तुम्हाला उपलब्ध करून देते पगार तारण कर्ज; ज्यात तुमच्या येणाऱ्या पगारावर तुम्हाला कमीत कमी कागदपत्रांवर तात्काळ कर्ज मिळवून दिले जाते व वेळीच तुमची गरज पूर्ण करण्यासाठी हातभार लावला जातो.
तुम्ही नोकरदार असाल तर गरजेच्या वेळी पगाराची वाट पाहू नका. पगार तारण कर्जासाठी व त्याबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.
पैशांची गरज ही कधी सांगून येत नसते. पण अशा अचानक ओढवलेल्या अडचणीत पैशांचं सोंग आणता येत नाही. तुमच्या अडचणीच्या काळात श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी तुमच्या पाठीशी उभी राहते खंबीरपणे. अशा कठीण परिस्थितीमध्ये संस्थेत सोनेतारण ठेवा आणि जितकं सोनं तितकं कर्ज मिळवा, तेही कमीत कमी कागदपत्रांच्या मदतीने अत्यंत कमी व्याजदरात आणि कुठल्याही प्रोसेसिंग फीस शिवाय! कारण आम्ही जाणतो तुमची गरज.
या सोने तारण कर्जाबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.
आजच्या धावपळीच्या जगात आपल्याकडे स्वतःचं वाहन असेल तर आयुष्य सुखकर आणि सोयीस्कर होतं. म्हणून तर, वाहन हे आजच्या काळात केवळ एक प्रतिष्ठेचं साधन राहिलं नसून एक अत्यावश्यक गरज झाली आहे. कित्येक लोकांचा तर व्यवसाय आपल्या वाहनांवरच अवलंबून असतो, तर कित्येक आपलं स्वतःचं वाहन असावं असं स्वप्न पाहतात. मात्र अनेक आर्थिक अडचणी या स्वप्नांच्या आड येत असतात. शिवाय वाहन खरेदीसाठी मोठी रक्कम मोजावी लागते जी सहजासहजी आपल्या हाताशी नसते. पण आता श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटीच्या वाहन कर्ज योजनेंतर्गत वाहन कर्ज घ्या कमीत कमी व्याजदरात, शिवाय कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ कर्ज मंजुरी!
सज्ज व्हा आपले आयुष्य सुखकर आणि सोयीस्कर करण्यासाठी! वाहन कर्जाबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
अडचण मोठी असो अथवा लहान, तुमच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणात श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी देईल तुमची साथ! तुमच्या अडचणीच्या काळात आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ तारणी कर्ज, जेणेकरून तुमच्या गरजा व्हाव्या वेळेत पूर्ण!
आपल्या स्थावर मालमत्तेवर तारणी कर्ज घेण्यासाठी अथवा त्याबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
अवघ्या जगासाठी अन्नधान्य पिकवतांना बळीराजा अनेक आर्थिक अडचणींना सामोरा जातो. त्यामुळे बऱ्याचदा त्याला स्वतःसाठीही पैसे अपुरे पडतात. याच अडचणींचा विचार करून पैशांअभावी शेतकऱ्यांची प्रगती थांबू नये या हेतूने श्री व्यंकटेश मल्टीस्टेटने सुरू केली आहे 'समृद्ध शेतकरी कर्ज योजना'! या योजनेद्वारे शेतकऱ्यांना रु. २ लाखांपर्यंत अत्यंत कमी कागदपत्रांसह त्वरित कर्ज उपलब्ध करून दिले जाते. शिवाय या योजनेत शेतकऱ्यांना मासिक हप्त्याचे बंधन राहत नाही. सोबतच संपूर्ण कर्जाची रक्कम एकाच वेळी फेडण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते.
आता बळीराजाच्या घरी येणार आनंदाची सुगी! समृद्ध शेतकरी कर्ज योजनेबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी 18005322111 या क्रमांकावर संपर्क साधा अथवा आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.
आता छोट्या आर्थिक अडचणींमध्ये मोठे कर्ज डोक्यावर घेण्याची आवश्यकता नाही, कारण श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी तुम्हाला उपलब्ध करून देते तुमच्या संस्थेमधील असलेल्या ठेवीवर मुदत ठेव तारण कर्ज; ज्यात तुम्हाला कर्जाच्या कालावधीत तुमच्या ठेवीवर व्याजही मिळते आणि असलेल्या ठेवीवर तात्काळ कर्जही उपलब्ध होते. यामुळे तुमची बचत सुरक्षित राहते आणि तुमची आर्थिक गरज देखील पूर्ण होते.
कमीत कमी कागदपत्रात ताबडतोब मुदत ठेव तारण कर्ज घेण्यासाठी अथवा त्याबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
महिला सबलीकरण, महिला व्यावसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी, श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी कायम तत्पर असते आणि म्हणूनच संस्था बचत गटांना देते महिला बचत गट कर्ज. आज असंख्य महिला बचत गट संस्था जोमाने कार्यरत आहेत, स्वबळावर एक नवा व्यवसाय उभा करीत आहेत. त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी देते अत्यंत कमी व्याजदरात त्वरित कर्ज मंजुरी.
व्यवसाय वृद्धीसाठी अथवा स्वप्नपूर्तीसाठी महिला बचत गट कर्ज हवे असल्यास आपल्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा 1800-5322-111 वर कॉल करा.
व्यवसाय म्हटला की चढ उतार आलेच, पण हे चढ उतार पार करण्याची जोखीम घेऊन ते सक्षमपणे पार करूनच एक यशस्वी व्यवसाय उभा करता येऊ शकतो. तुमच्या व्यवसाय वृद्धीसाठी आणि आर्थिक अडचणींच्या काळात श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी आहे तुमच्या पाठीशी. तुमच्या व्यवसायासाठी साथ देत आहे कॅश क्रेडिट लोन. आता आपलं समृद्ध व्यवसायाचं स्वप्न पूर्ण करा.
कॅश क्रेडिट लोन योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क शाखेला भेट द्या किंवा 1800-5322-111 वर कॉल करा.