ठेव योजना

मुदत ठेव योजना (FD)

व्यवसाय असो अथवा नोकरी, अनेकदा पैसे येतात आणि मुठीतल्या वाळूसारखे हातातून कधी निघून जातात तेच कळत नाही. परिणामी, जमवलेली बचतही अशीच निघून जाते. म्हणूनच हे पैसे एका सुरक्षित ठिकाणी गुंतवून ठेवायला हवे आणि त्यासाठीच श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटीची मुदत ठेव योजना आहे आपल्या सेवेत; ज्यात रक्कम सुरक्षित राहते व आकर्षक व्याजही मिळते. आपली बचत नाहक खर्च होऊ नये यासाठी बचत ठराविक कालावधीसाठी मुदत ठेव म्हणून ठेवणे एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे!


तुमची बचत सुरक्षित ठेवणे आणि मुदत ठेवीवर जास्तीत जास्त परतावा देणे ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. आमच्या मुदत ठेव योजना लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.

मासिक ठेव योजना

आज लावलेले झाड भविष्यात फळांसह सावलीही देते. पण त्या भविष्यातील आरामदायी जीवनासाठीचे बीज आजच पेरायला हवे, जेणेकरून वृद्धापकाळात निश्चिंत जीवनाचा आनंद घेता येईल आणि यासाठीच श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटीची मासिक ठेव योजना सर्वोत्तम ठरते.
एका ठराविक वयानंतर आपली सर्व कामं, जबाबदाऱ्या आणि धकाधकीच्या जीवनाला बाजूला सारून समाधानाने जगण्याची वेळ येते. या समाधानी जीवनात आर्थिक अडचणींमुळे व्यत्यय येऊ नये यासाठी आताच तरतूद करा, आमच्या मासिक ठेव योजनेमध्ये रु. १ लाखाच्या गुंतवणुकीवर प्रतिमहा आकर्षक व्याजदरासह परतावा मिळवा, जेष्ठ नागरिकांसाठी ०.५% अधिक व्याजदराचा फायदा.


निवृत्तीनंतर आनंद द्या समाधानी जीवनाचा, मासिक ठेव योजनेच्या अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.





आवर्तक ठेव योजना (RD)

व्यवसाय असो अथवा नोकरी, अनेकदा पैसे येतात आणि मुठीतल्या वाळूसारखे हातातून कधी निघून जातात तेच कळत नाही. परिणामी, जमवलेली बचतही अशीच निघून जाते. म्हणूनच हे पैसे एका सुरक्षित ठिकाणी गुंतवून ठेवायला हवे आणि त्यासाठीच श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटीची मुदत ठेव योजना आहे आपल्या सेवेत; ज्यात रक्कम सुरक्षित राहते व आकर्षक व्याजही मिळते. आपली बचत नाहक खर्च होऊ नये यासाठी बचत ठराविक कालावधीसाठी मुदत ठेव म्हणून ठेवणे एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे!


तुमची बचत सुरक्षित ठेवणे आणि मुदत ठेवीवर जास्तीत जास्त परतावा देणे ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. आमच्या मुदत ठेव योजना लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.

दाम दीडपट ठेव योजना

लहानसहान गरजा पूर्ण करता करता मोठी स्वप्नं स्वप्नंच राहून जातात. पण आता नाही! तुमचं प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण, श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटीच्या दाम दीडपट ठेव योजनासह, ज्यात तुमच्या गुंतवणुकीवर फायदा मिळेल पाचपट, म्हणजे तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल झटपट!


दाम दीडपट ठेव योजनेंतर्गत १२ वर्षात तुम्ही गुंतवलेली रक्कम पाचपट होईल. उदा. तुम्ही रु. १ लाख गुंतवले तर १२ वर्षांनंतर तुम्हाला रु. ५ लाख मिळतील. अशी स्वप्नपूर्तीची संधी सोडू नका, लवकरात लवकर निर्णय घ्या एका उज्ज्वल भविष्यासाठी! फ्युचर प्लस ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.

शुभमंगल ठेव योजना

मुलांचं लग्न हे आई-वडिलांच्या आणि मुलांच्या आयुष्यातील एक महत्वाचा, अत्यानंदाचा व कायम लक्षात राहणारा क्षण असतो. त्यात कुठल्याही प्रकारची कमी राहू नये, कुणाच्याही इच्छा-आकांक्षांना तडा जाऊ नये, हा सोहळा कायम एक अविस्मरणीय सोहळा व्हावा यासाठी अनेक कुटुंब तत्परतेने झटत असतात, त्यासाठी मोठा खर्च देखील करावा लागतो. अशात आपल्या बचती, घरातील दागिने, वेळप्रसंगी घर आणि शेतीदेखील विकल्याची उदाहरणं आपल्या ऐकण्यात आली असतीलच, मात्र वेळीच निर्णय घेऊन लग्नासाठी आतापासूनच पूर्वतयारी केली तर कुठलीही अडचण न येता लग्नाचा आनंददायी सोहळा अगदी सहज पार पाडता येईल.


आता मुलांच्या लग्नकार्याची चिंता सोडा, श्री व्यंकटेश सोसाटीच्या शुभमंगल ठेव योजनेंतर्गत मुलाच्या/मुलीच्या जन्मानंतर रु.४५ हजार एकरकमी गुंतवले तर १८ वर्षानंतर तुम्हाला रु.४ लाख मिळतात. ही रक्कम आपल्यावरील आर्थिक भार खूप हलका करेल व तुमचे आनंदाचे क्षण कुठल्याही आर्थिक व्यत्ययाशिवाय आनंदाने पार पडतील. शुभमंगल ठेव योजनेच्या अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.

ट्रिपल डिपॉझिट योजना

तुम्ही जमलेली बचत जर योग्य ठिकाणी गुंतवली तर त्यातून तुम्हाला भरपूर फायदा मिळू शकतो, जशी की व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटीची ट्रिपल डिपॉझिट योजना; जिथे आपल्या गुंतवणुकीवर ठराविक काळानंतर मिळेल तीन पट फायदा! सुरक्षित आणि खात्रीशीर मिळकतीचा राजमार्ग, ट्रिपल डिपॉझिट योजना!


आमच्या या योजनेंतर्गत १०० महिन्यांत तुम्ही गुंतवलेली रक्कम तीनपट मिळते. उदा. तुम्ही रु. १ लाख गुंतवले तर १०० महिन्यांनंतर तुम्हाला रु. ३ लाख मिळतात. म्हणून वेळीच निर्णय घ्या, १०० महिन्यांत आपली गुंतवणूक ट्रिपल करा. ट्रिपल डिपॉझिट योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.

दाम दुप्पट योजना

मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळकतही हवी मोठी! आज तुम्ही तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहात, त्यालाच जोड द्या आकर्षक व्याजदराची. आपल्या सेविंग्स श्री व्यंकटेश मल्टिपर्पज सोसायटीच्या दाम दुप्पट योजनेत गुंतवा. जेणेकरून, ठराविक काळानंतर तुमची रक्कम होईल दुप्पट आणि तुमचं हवं ते स्वप्न पूर्ण होईल अपेक्षेपेक्षा लवकर!


आमच्या दाम दुप्पट योजनेंतर्गत 77 महिन्यात तुम्ही गुंतवलेली रक्कम दुप्पट होऊन मिळते. उदा. तुम्ही रु. १ लाख गुंतवले तर 77 महिन्यानंतर तुम्हाला रु. २ लाख मिळतात. मग आजच निर्णय घ्या, आपल्या स्वप्नांच्या दिशेनं पहिलं पाऊल उचला. दाम दुप्पट योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.

फ्युचर बिल्डर ठेव योजना

स्वप्नं कधीच संपत नाहीत. आज एक स्वप्न पूर्ण झालं की त्याहून मोठं स्वप्नं आपण पाहतो. कधी आजच्यासाठी तर कधी भविष्यासाठी कितीतरी गोष्टी करू असा विचार आपण करतो आणि स्वप्नं केवळ स्वप्नंच बनून राहतात. आजच्या गरजांसह भविष्यातील स्वप्नंही पूर्ण करता यावीत म्हणूनच सादर आहे श्री व्यंकटेश मल्टीस्टेटची 'फ्युचर बिल्डर ठेव योजना'.


आता पूर्ण होतील सर्व स्वप्नं! फ्युचर बिल्डर ठेव योजनेचा लाभ घ्या आणि भविष्यातील गरजांसाठी आत्तापासूनच बचत करा. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.

पिग्मी/ दैनंदिन ठेव योजना

आजच्या छोट्याश्या गुंतवणुकीतून भविष्याची मोठी बचत तयार होते. म्हणूनच स्वतःला छोट्या छोट्या बचतीची सवय लावायला हवी. याच विचारातून आम्ही एक तरतूद केली आहे. रोजंदारीवर काम करणारे कामगार, लहानसहान व्यापारी आणि शेतकऱ्यांना बचतीची सवय लागावी तसेच त्यांच्या लग्न, घर खरेदी, वाहन खरेदी अशा मोठ्या भांडवली गरजा वेळीच भागवण्यासाठी मोठी रक्कम साठवली जावी म्हणून श्री व्यंकटेश मल्टीस्टेटने पिग्मी अर्थात दैनंदिन ठेव योजना सुरू केली. या योजनेत रोजच्यारोज अगदी कमीत कमी रक्कम गुंतवून उद्या एकत्रितपणे एका मोठ्या रकमेचा तुम्ही लाभ घेऊ शकता.


छोट्या छोट्या बचतीतून पूर्ण करा स्वप्नांचा महासागर! पिग्मी / दैनंदिन ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.

महिला बचत गट ठेव योजना

दिवसेंदिवस महिला प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. केवळ शहरातच नाही तर खेड्यातील महिला देखील महिला बचत गटाच्या सहाय्याने एक यशस्वी व्यवसाय करीत आहेत. त्यांच्या व्यवसायाला आणखी सक्षम व सबळ करण्यासाठी श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी सादर करीत आहेत महिला बचत गट ठेव योजना. संस्थेच्या या योजनेत महिला बचत गटाची कामे सुरक्षित तर राहतीलच, शिवाय त्यावर उत्तम परतावा देखील मिळेल.


महिला बचत गट ठेव योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटीच्या शाखेला भेट द्या किंवा 1800-5322-111 वर कॉल करा.