स्मार्ट बँकिंग

पेपरलेस बँकिंग

आमचे ग्राहक नेहमीच जगाप्रमाणे अपडेट असावे व येणाऱ्या आधुनिक क्रांतीसाठी ते तयार असले पाहिजे या हेतूने संस्थेने नेहमीच काळाची गरज ओळखून पाऊले उचलली आहे. संस्थेच्या खातेदारांना NEFT / RTGS / IMPS सुविधा, DD, चेक क्लिअरन्स सुविधा, भारतात कुठेही पैसे पाठविण्याची आणि स्विकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. आधुनिक बँकिंगचा जास्ती-जास्त खातेदारांनी लाभ घ्यावा यासाठी पुढील सुविधा पुरविल्या जातात.

मोबाईल बँकिंग

ग्राहकांचे व्यवहार अधिक गतिमान व रोकड विरहित (कॅशलेस) व्हावे यासाठी व्यंकटेश मल्टिस्टेट मोबाईल बँकिंग हि सुविधा देत आहे. याद्वारे ग्राहक त्याच्या मोबाईल फोन वरून पैसे देणे-घेणे, बिल भरणे, खात्यातील शिल्लक तपासणे इ. कामे करू शकतो. हे मोबाईल अँप वापरण्याकरता अत्यंत सोपे आहे तसेच कुठल्याही अडचणीकरता संस्थेच्या टोल फ्री क्रमांवर संपर्क साधून ग्राहकांना बोलता येते.

इंटरनेट बँकिंग

आजकाल कोणालाही इंटरनेट शिवाय एक दिवस काढणे अवघड आहे, इंटरनेट मनोरंजनाबरोबर त्याच्या दैनंदिन कामातही महत्वाचा घटक आहे. आमचे अनेक ग्राहक नोकरदार आहेत व त्यांना छोट्या-मोठ्या कामाकरिता संस्थेत येणे शक्य होत नाही, त्यांच्या करता व्यंकटेश मल्टिस्टेटची इंटरनेट बँकिंग सुविधा महत्वाची ठरते. या द्वारे ग्राहक सर्व प्रकारची कामे घर अथवा ऑफिस मधून त्याच्या वेळेनुसार सहजपणे करू शकतो.

SMS बँकिंग

ग्राहकांकडे स्मार्ट फोन अथवा इंटरनेट नसेल SMS बँकिंग ही सुविधा उपयोगी ठरते. तुम्ही कोणालाही पैसे देऊ शकता अथवा घेऊ शकता व खात्यातील शिल्लक तपासू शकता. SMS बँकिंग वापराबद्दलची माहिती पुढीलप्रमाणे -फंड ट्रान्सफर : F 6404 C 2051 (F खाते क्र. खाते प्रकार रक्कम)

मिनी स्टेटमेन्ट : S 6404 (S तुमचा खाते क्र.)७७५५९०५५५५ या क्रमांकावर SMS पाठवा (C - करंट खाते, S - सेव्हिंग)

आधार बँकिंग

आधार बँकिंग ही सर्वात सोपी व सुरक्षित अशी आधार संलग्न पेमेंट सुविधा आहे. तुम्हाला दुकानदाराला पैसे द्यायचे असेल, तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करायचे असेल अथवा काढायचे असेल, लाईट बिल, फोन बिल इ. भरायचे असेल, असे सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार तुम्ही तुमच्या अंगठ्याच्या सहाय्याने याद्वारे करू शकता. यासाठी तुम्ही दुकानदाराकडील AEPS मशीन वर आपला अंगठा टेकवायचा, आपली आधार संलग्न बँक निवडायची आणि द्यावयाची रक्कम मशीन मध्ये टाकायची, त्वरित दुकानदाराच्या खात्यावर रक्कम जमा होईल.

QR कोड योजना

छोटे किंवा मोठे व्यावसायिक किंवा किराणा दुकानदार या सर्वांना रोजचे व्यवहार करताना विविध अडचणींना सामोर जावं लागत. कधी सुट्टे पैसे नसतात तर कधी रोखीचे पैसे बाळगण्याची चिंता असते. या सर्वावर वेंकटेश-मल्टिस्टेट घेऊन आले आहे बँकिंग सुविधा QR Code.