दिवस रात्र एक करून, काबाडकष्टाने एक-एक रुपया जोडून जमवलेली रक्कम एका सुरक्षित आणि विश्वासार्ह हाती हवी, तेव्हाच एका सर्वसामान्य माणसाला शांत झोप लागते. श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी तुमच्या या बचतीचे महत्त्व जाणते, म्हणूनच तुमची बचत आम्ही जबाबदारीने सांभाळतो आणि त्यावर जास्तीत जास्त परतावा देखील देतो. इतकंच नाही तर बचत खात्यासोबत चेकबुक, NEFT, RTGS, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, एसएमएस बँकिंग या सुविधादेखील देतो, जेणेकरून गरजेच्या वेळी तुम्हाला तुमची रक्कम त्वरित मिळावी.
आता आपल्या बचतीला सुपूर्द करा एका विश्वासार्ह ठिकाणी, बचत खात्यासंदर्भात अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.
एका उत्तम व्यवसायिकाला साथ हवी असते ती विश्वासार्ह व परिपूर्ण बँकिंग सेवांची, जी पूर्ण होते श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी मध्ये! कारण आम्ही आमच्या खातेधारकांना उपलब्ध करून देतो अत्याधुनिक बँकिंग सुविधा आणि जोडीला व्यवसायात आर्थिक स्थैर्य मिळावं म्हणून भक्कम पाठबळ! तुम्ही जर एक व्यवसायिक आहात तर आजच आपले चालू खाते उघडा आणि मिळवा NEFT / RTGS / IMPS, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, स्वाईप मशीन, आधार बँकिंग, इत्यादी सुविधा एकाच छताखाली.
निवडा व्यवसाय वृद्धीचा मार्ग श्री व्यंकटेश मल्टीस्टेट! अधिक माहितीसाठी नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.
करा स्मार्ट बचत कधीही, कुठूनही...
आजकालच्या व्यस्त जीवनात बचतीचा अत्यंत सोपा, सोईस्कर आणि सुरक्षित पर्याय म्हणजे डिजिटल पिग्मी अकाउंट! डिजिटल पिग्मी खाते तुम्हाला मोबाइल ॲप किंवा ऑनलाइन बँकिंग प्लॅटफॉर्म सारख्या डिजिटल चॅनेल मार्फ़त नियमितपणे लहान-मोठ्या रकमेची बचत करण्या करीता मदत करते. यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची किंवा कुठलीही डायरी मेंटेन करण्याची गरज नाही, डिजिटली काही क्लिक मध्ये तुमचे पिग्मी खाते सुरु होईल.
व्यावसायिक असो किंवा नोकरदार, गृहिणी असो किंवा उद्योजक हे खाते कुणीही सहज सुरु करू शकतं. हे डिजिटल पिग्मी खाते तुमच्या कौटुंबिक किंवा व्यावसायिक गरजा, लग्नसोहळा किंवा आपातकालीन परिस्थितीत मोठे उपयोगात येते, आणि तुम्हाला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवते.
स्मार्ट गुंतवणूकीसह तुमचे भविष्य सुरक्षित करा! तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणाची प्लॅनिंग करत असाल, तुमच्या सेवानिवृत्तीचं प्लॅनिंग करत असाल किंवा भविष्यातील गरजांसाठी फंड उभा करत असाल, तर या प्रवासात फ्युचर प्लस डिजिटल SIP ठरेल तुमचा विश्वासू पार्टनर. व्यंकटेश मल्टीस्टेटमध्ये, आम्ही जाणतो तुमच्या आर्थिक नियोजन आणि वाढीचे महत्त्व. Future Plus Digital SIP सोबत देतो सुरक्षित भविष्याची हमी. म्हणून सर्वोत्तम परताव्यासाठी निवडा गुंतवणूकीचा एक स्मार्ट मार्ग.
फ्यूचर प्लस डिजिटल SIP सह सुरक्षित करा तुमचे भविष्य!
संस्थेचा तपपूर्ती वर्षामध्ये स्मार्ट फ्यूचर बॉक्स योजना सुरू करण्याचा मानस आहे. याचा मुख्य हेतू हा आहे की, विद्यार्थांना शालेय जीवनात बँकिंग व्यवहार (आर्थिक ज्ञान) शिकवणे व त्यांना आर्थिक साक्षर करणे. या योजनेमुळे भारतातील भावी पिढी ही आर्थिकदृष्ट्या सुजान, सुसंस्कृत व जाणीव असणारी तयार व्हावी. तसेच, लहानपणी म्हणजे शालेय जीवनात बचतीचे महत्त्व कळल्यास सुजाण नागरिक व पैशाचे मूल्य समजणारी पिढी तयार होईल.
स्मार्ट फ्युचर बॉक्सचे फायदे
कुटुंबातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील तर प्रत्येक कुटुंब सुरक्षित, समृद्ध व सुखी राहील आणि म्हणूनच श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी सादर करीत आहेत सखी समृद्धी बचत खाते! महिलांच्या सबलीकरण व सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला महिला वर्गाकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेंतर्गत महिलांना झिरो बॅलन्समध्ये सखी समृद्धी खाते उघडता येते, ज्यात त्यांना 50 हजार रुपयांचा अपघाती विमा मोफत मिळतो व सोबतच सखी समृद्धी क्रेडिट कार्ड देखील दिले जाते.
एका सक्षम भविष्यासाठी आजच निर्णय घ्या. सखी समृद्धी बचत खाते उघडण्यासाठी नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.