श्री व्यंकटेश मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी
आपल्या स्वत: च काही असावं असं प्रत्येकालाच वाटत. पण, आपली आपल्या समाजाप्रती काही जबाबदारी आहे. त्यासाठी आपल्याला काही करणं आवश्यक आहे. हा विचार प्रत्येकालाच येईल याची शक्यता फार कमी आहे. मात्र, काही प्रगतशील विचारांच्या तरुणांनी याच विचाराची कास धरुन बारा वर्षांपूर्वी श्री व्यंकटेश मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली होती.
ग्रामीण भागात तत्पर आर्थिक सेवा प्राप्त होणं मुश्किल आहे. हे त्यांना माहिती होतं. म्हणून ग्रामीण भागातील सर्व जनतेला आर्थिक सेवा तत्पर मिळाव्या हा उद्देश ठेवून या संस्थेचा श्रीगणेशा करण्यात आला होता. आज बघता बघता समाधानी खातेदारांचा महापारीवार झाला आहे.
गेल्या काही वर्षात संकटांचा सामना करत, कुठेच न डगमगता खातेदारांना सहज बॅंंकिंग सुविधा मिळाव्यात यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून संस्थेने सर्व शाखा डिजिटल केल्या असून आता खातेदारांना घरबसल्या बॅंकेचे व्यवहार करता येत आहेत. तसेच, नवीन ग्राहकांनाही काही क्षणातच अकाउंट ओपन करण्याची सुविधाही संस्थेच्या वतीने देण्यात येत आहे.
याचबरोबर मोबाइल बँकिंग, नेट बँकिंग, आधार बँकिंग, एसएमएस बँकिंग, मायक्रो एटीएम इत्यादी महत्वाच्या सुविधा संस्थेच्या वतीने खातेदारांना दिल्या जात आहेत. याशिवाय संस्थेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाला स्वीकारत काळानुरुप कार्यपद्धतीत बदल करत नेहमीच ग्राहक हिताला प्राधान्य दिले आहे.