पैसा हातात आला की खर्च होतो. मग तो कुठे खर्च झाला याचा काहीच मेळ लागत नाही. यामुळे अनेक जण टेन्शनमध्ये येतात. तुमच्यातही असे कोणीतरी असतीलच. काय बरोबर ना?? त्यामुळे तुम्ही छोटा-मोठा व्यवसाय करत असाल किंवा असा रोजगार जिथे तुम्हाला रोज पैसे मिळत आहेत.. ते पैसे त्याच दिवशी बचत करायचे. आता तुम्ही म्हणाल पैसे तर बचत असतातच.. पण आपल्याला तशी बचत नको आहे. काय, बरोबर ना?? म्हणूनच व्यंकटेश मल्टीस्टेटच्या सर्वाधिक उघडल्या जाणाऱ्या अकाउंटविषयी आज आपण जाणून घेऊया.
कडक प्रेसचे कपडे, हातात काळी बॅग, रोज न चुकता दुकानात किंवा घरी येऊन पैसे घेणारी, छोट्या पुस्तिकेवर त्याच पैशांची नोंद ठेवणारी व्यक्ती एकदा तरी तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघितलीच असेल. आजघडीला सर्व व्यवहार डिजिटल होतं असताना ही व्यक्ती तेवढ्याचं जोमाने कार्यरत आहे.. होय, पिग्मी एजंट.. तुमच्या रोजच्या कमाईला वाढवणारी तुमच्या जीवाभावाची व्यक्ती. या एजंटमुळे अनेकांना आपली स्वप्न पूर्ण करता येत आहेत. आता डिजिटल युगात पिग्मीचं महत्व वाढलं आहे. कारण, तुम्ही आता कधीही आणि कुठूनही पिग्मीत बचत करू शकणार आहात. मात्र, अजूनही बऱ्याच जणांना पिग्मीविषयी माहिती नाही आहे. ही दुर्दैवाची बाब आहे.
गावा-खेड्यातील नागरिकांना पैशांची बचत करणं सोपं व्हावं. कारण, एकठोक मोठी रक्कम जमा करणं त्यांना मुश्किल असल्यामुळे रोज थोडी-थोडी रक्कम जमा करून त्यांना आर्थिक गरजा भागवता याव्यात. यासाठी पिग्मीचा आरंभ करण्यात आला. म्हणजेच तुम्ही जर व्यावसायिक किंवा रोजगार असाल तर तुम्ही एक आकडा ठरवून रोज गुंतवणूक करू शकता. ही सुविधा अनेक संस्थामध्ये उपलब्ध आहे. मात्र, तुम्हाला पिग्मीचा डिजिटली अनुभव घ्यायचा असल्यास व्यंकटेश मल्टीस्टेट खास आहे. एकदा अकाउंट ओपन केल्यावर तुम्ही घरबसल्या त्यात बचत करू शकता..
पिग्मीत रोजची गुंतवणूक काय आहे, हे आपण उदाहरणावरून समजून घेऊया.. समजा तुमचं छोटेखानी हाॅटेल आहे. तुमचा रोजचा गल्ला 3 हजारांहून अधिक आहे. मग तुम्ही 500 रुपयांची पिग्मी करायचं ठरवलं. तर रोज तुमच्या खात्यातून 500 रुपये कपात होणार. तसेच, एका ठराविक अवधीनंतर तुम्ही ते पैसे काढू शकता. विशेष म्हणजे यावर मिळणारे व्याजही आकर्षक असते.
ज्या व्यक्तींना रोज त्यांच्या कामाचा पैसा मिळतो. मग तो व्यवसाय असो की अन्य एखादा रोजगार त्यांना पिग्मीत गुंतवणूक करण्यासाठी मार्ग मोकळा आहे. यामुळे त्यांना नियमित बचत करण्याची सवय आणि शिस्तही लागते.
तसेच, रक्कम आपल्या बजेटनुसार ठरवलेली असल्याने ती जमा करण्याचं टेन्शन राहत नाही.. तेवढे पैसे आपण आधीच बाजूला काढून ठेवतो.. त्यामुळे ज्यांच्याकडे रोजचा खेळता पैसा आहे. त्यांनी पिग्मीत गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं.
एखादी मेडिकल इमर्जन्सी आली, मुलांची शाळेची फी द्यायची असली.. तर अशा वेळी तुम्ही ती पिग्मी बंद करून, त्यातून पैसे काढू शकता किंवा त्यावर कर्ज मिळवू शकता.
जर तुम्हाला व्यवसाय वाढवायचा असेल, त्यासाठी पैसे लागत असतील. तर पिग्मीवर तुम्ही कर्ज मिळवू शकता. त्यामुळे अन्य कोणाकडून कर्ज घ्यायची गरज पडत नाही.
ठराविक अवधीनंतर ठरलेलं व्याज तुमच्या अकाउंटवर ट्रान्सफर होत. त्यामुळे तुमची रक्कम वाढण्यास मदत होते.
तसेच, काही संस्था पिग्मीवर मोफत अपघाती विमा संरक्षणही देतात. त्यामुळे आपल्या जीवालाही एका अर्थाने सुरक्षित करण्याचं काम या संस्था करत आहेत.
पिग्मी प्रत्येकाला परवडणारी आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या बजेटनुसार दैनिक बचत करू शकता. काही संस्थामध्ये कमीतकमी बचतीची मर्यादा ठरलेली असून तुम्ही ५० ते १०० रुपयांपासून दैनिक बचत करू शकता. ही रक्कम छोटी असली तरी शेवटी पैसा हातात येईल.. तेव्हा तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.. त्यामुळेच प्रत्येकाचं पिग्मी अकाउंट असणं गरजेचं आहे.
आजघडीला सर्वजण मोठी गुंतवणूक करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत. मात्र, पिग्मी अकाउंट आपल्याला छोट्या बचतीने काय होऊ शकते.. याचं वास्तव दाखवत आहे. पिग्मी करत राहिल्यास तुमची स्वप्नं तुम्ही पूर्ण करू शकणार यात शंका नाही.
याचबरोबर तुम्हाला बचतीची सवय लागणार. तुम्हाला कोणाकडूनही कर्ज घेण्याची वेळ येणार नाही. तसेच, तुम्हाला आपघाती इन्शुरन्सद्वारे तुमच्या जीवाचं संरक्षणही मिळणार आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला व्यंकटेश मल्टीस्टेटमध्ये सहज मिळणार आहेत. शिवाय तुमचा पैसाही सुरक्षित हातात राहणार आहे. म्हणून आजच व्यंकटेशमध्ये पिग्मी करा.. बचत मोठी करा.