प्रत्येक कुटुंबाच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात, जेव्हा अचानक मोठ्या खर्चासाठी तयार राहवं लागते. मग ते मुलांचे शिक्षण असो, लग्न असो, घराची दुरुस्ती किंवा एखादी मेडिकल इमर्जन्सी. अनेकदा अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बरेच जण कर्जाचा आधार घेतात. परंतु, कर्ज म्हणजे व्याजाचा भार आणि दीर्घकाळ चालणारी ईएमआयची जबाबदारी. अशा वेळी प्रश्न पडतो की, कर्ज न घेता आपण हे मोठे खर्च पूर्ण करू शकतो का? याचे उत्तर आहे'सिंकिंग फंड'. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया..
सिंकिंग फंड ही एक अशी आर्थिक रणनीती आहे, ज्यामध्ये तुम्ही हळूहळू छोटी-छोटी रक्कम वाचवून एक मोठा फंड तयार करता. ही पद्धत तुम्हाला भविष्यातील मोठ्या खर्चांसाठी सज्ज करते आणि कर्जाच्या गरजेला कमी करते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला माहित असेल की पुढील दोन वर्षांत मुलांची शाळा फी किंवा घराच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च होणार आहेत, तर तुम्ही दरमहा एक निश्चित रक्कम बाजूला ठेवून हा फंड तयार करू शकता. जेव्हा तो खर्च प्रत्यक्ष समोर येईल, तेव्हा तुम्हाला बँकेकडे हात पसरण्याची गरज पडणार नाही.
या फंडाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मानसिक समाधान. जेव्हा तुम्हाला माहित असते की येणाऱ्या मोठ्या खर्चासाठी तुमची आधीच तयारी सुरू आहे, तेव्हा चिंता कमी होते. त्याचबरोबर, हे तुम्हाला आर्थिक शिस्तही शिकवते. दरमहा बचत करण्याची सवय फक्त मोठे खर्च सोपे करत नाही, तर तुमचे आर्थिक आरोग्यही मजबूत करते.
तज्ज्ञांच्या मते, सिंकिंग फंडाची रक्कम वेगळ्या खात्यात ठेवली पाहिजे, जेणेकरून ती रक्कम दैनंदिन खर्चात वापरली जाणार नाही. यासाठी तुम्ही बॅंकिंग क्षेत्रात विश्वसनीय व अग्रेसर असलेल्या व्यंकटेश मल्टीस्टेटचे या रिकरिंग डिपॉझिट, डिजिटल SIP गुंतवणूक किंवा साधे सेव्हिंग अकाउंट वापरू शकता. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही बचत नियमित असावी. अगदी छोट्या रकमेपासून सुरुवात करूनही तुम्ही वेळेसह मोठा फंड उभारू शकता.
सिंकिंग फंडाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे तो तुम्हाला कर्जाच्या जाळ्यातून वाचवतो. कर्ज घेतल्यावर व्याजामुळे तुमचा मूळ खर्च कित्येक पटीने वाढतो, याउलट सिंकिंग फंडामध्ये तुम्ही स्वतःच्याच बचतीचा वापर करता. ही पद्धत तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य देते आणि तुमच्या भविष्यातील योजना सुरक्षित करते.
कामाची गोष्ट
सिंकिंग फंड ही फक्त बचतीची पद्धत नसून आर्थिक जीवन सहज करण्याचा मार्ग आहे. हे आपल्याला शिकवते की, मोठी स्वप्ने आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी नेहमीच कर्ज घेणे आवश्यक नसते. थोडी शिस्त आणि दूरदृष्टी बाळगली, तर आपण आपले सर्व खर्च स्वतःच्या हिमतीवर यशस्वीपणे हाताळू शकतो.