एखादी गोष्ट सांभाळून, जपून कशी वापरावी, हे आपण घरच्यांकडे पाहूनच शिकतो. आपल्याला कोणी सांगत नाहीत की, ती गोष्ट अशीच करा. पण, तिचे महत्व कळत जाऊन, आपणही तसंच करायला लागतो.. हीच गोष्ट बचतीलाही लागू होते. कारण, तुमच्याकडे बचत असेल तरच तुम्ही प्रत्येक क्षण संस्मरणीय करू शकता. तुमचे हे क्षण संस्मरणीय व्हावे, म्हणूनच व्यंकटेश मल्टीस्टेट तुमच्यासाठी खास सुविधांचे सेव्हिंग अकाउंट घेऊन आले आहे. ते का खास आहे, याशिवाय त्याच्याविषयी अन्य गोष्टीही आपल्याला समजून घेता येणार आहे.. चला तर मग त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया..
सेव्हिंग अकाउंटमुळे तुम्हाला एक ठरावीक रक्कम बाजूला काढायची आपोआप सवय लागते. तुम्ही अशीच शिस्तबद्ध बचत दीर्घकाळासाठी करत राहिल्यास, तुमच्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते. तसेच, हीच बचत तुमच्या भविष्याला आर्थिक सुरक्षितता निर्माण करते. याचबरोबर नेहमी बचत करत राहिल्याने तुमचं आर्थिक नियोजन अधिक मजबूत होऊन अनपेक्षित खर्चांना तुम्ही सहज हाताळू शकता. म्हणून अत्याधुनिक सुविधा असणाऱ्या व्यंकटेश मल्टीस्टेटचे V11 डिजिटल सेव्हिंग अकाउंट तुम्ही घरबसल्याच उघडू शकता.
तुम्ही व्यंकटेश मल्टीस्टेटमध्ये एकदा खाते ओपन केल्यावर तुम्ही कधीही अन् कुठूनही पैसे काढू शकणार आहात. त्यामुळे तुमच्या आर्थिक गरजा छोट्या असोत किंवा मोठ्या, पैसे सहज तुमच्या हातात उपलब्ध असणार आहेत. यासाठी संस्थेचे बॅंकिंग ॲप असून तुम्ही त्याचा वापर करून, अन्य सुविधांचाही लाभ घेऊ शकणार आहात..
पैसा कुठे ठेवायचा म्हटल्यावर त्याच्या सुरक्षेविषयी प्रत्येकालाच प्रश्न पडतो. तो पडणं साहजिकही आहे. मात्र, व्यंकटेशमध्ये खातं उघडल्यावर तुम्ही सुरक्षेविषयी निवांत राहू शकता. कारण, गेल्या १२ वर्षांपासून व्यंकटेश मल्टीस्टेट विश्वसनीय सेवा देत असून ग्राहकांचा व व्यवसायाचा आकडा वाढता आहे. त्यामुळे आधुनिक सेवांसह तुमचा पैसा व्यंकटेशमध्ये सुरक्षित राहील..
तुम्ही व्यंकटेशमध्ये सेव्हिंग खाते ओपन केल्यावर तुम्हाला सर्व प्रकारच्या व्यवहारांच्या सुविधा आपोआप मिळतात. यामध्ये मग UPI पेमेंट, नेट बँकिंग किंवा QR कोडसह सर्व पेमेंट जलद आणि सुरक्षित करण्याची सुविधा आहे. याशिवाय, तुमचे खाते डिजिटल वॉलेट, पेमेंट प्लॅटफॉर्म आणि आवर्ती ठेव योजनांशी सहज जोडता येते, त्यामुळे व्यवहार अधिक सोपे आणि सुलभ होतात.
तुम्ही खातं उघडायचं ठरवलं असल्यास, तुमच्या आवश्यकतेनुसार व्यंकटेश मल्टीस्टेटमध्ये सहज खातं उघडू शकता. ग्राहकांच्या सोईनुसार विविध प्रकारची बचत खाती संस्थेने उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये सर्वसामान्य, विद्यार्थी, गृहिणी, तरुण व्यावसायिक किंवा ज्येष्ठ नागरिक यांच्या गरजेनुसार खाते आहेत. प्रत्येकासाठी व्यंकटेश मल्टीस्टेटने काही तरी खास वैशिष्ट्यांची सेवा उपलब्ध करून दिली आहे.
बचत खातं उघडणं फक्त तुमच्या पैशांच्या सुरक्षेसाठीच नाहीतर याचे अन्यही फायदे आहेत. तसेच, या खात्यासह बऱ्याच सुविधांचा लाभ आपल्याला मिळणार आहे. यामध्ये मोफत चेकबुक, एसएमएस अलर्ट, QR कोड आणि अन्य अनेक फायदे तुम्हाला आर्थिक व्यवहार आणखी सोपा करायला मदत करतात.
बचत खाते हे तुमची संपत्ती वाढवण्याचा सुरक्षित आणि कमी जोखमीचा मार्ग आहे. तुम्ही नियमित बचत करून, तुमच्या आर्थिक उद्दीष्टांवर नियंत्रण मिळवू शकता. तसेच, तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टीही घेऊ शकता. या सर्वांसाठी तुमच्याकडे फक्त सेव्हिंग अकाउंट असणं आवश्यक आहे.
तुम्हाला तुमचा आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावा, असं वाटत असल्यास सेव्हिंग अकाउंट असणं आवश्यक आहे. हे तुम्हाला वरील गोष्टींवरून समजलेच असेल. याचा वापर तुम्ही इमर्जन्सी फंड तयार करण्यासाठी, भविष्यासाठी योजना आखण्यासाठी किंवा आणखी काही महत्वाचे नियोजन करण्यासाठी करू शकता..
याशिवाय आणखी फायदे हवे असल्यास आजच तुमच्या जवळच्या व्यंकटेश मल्टीस्टेटच्या शाखेला संपर्क करा. कारण, इथे माणूस जपला जातो, त्याचा पैसाही सुरक्षित ठेऊन, मोठा केला जातो.. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत अकाउंट ओपन केले नसल्यास, आत्ताच व्यंकटेश मल्टीस्टेटमध्ये खातं उघडा, भविष्य उज्ज्वल करा.