आयुष्यभर काम केल्यानंतर थोडा तरी निवांत वेळ मिळावा, कुठे तरी फिरायला जावं. अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण, मग त्यानंतर काय?? नेहमी कामात व्यस्त असल्यामुळे रिकामं तरी कुठपर्यंत बसून राहायचं. या एका प्रश्नाने अनेक रिटायर झालेल्यांची झोप उडवलेली असते. मात्र, ते आपलं आयुष्य आनंदी ठेवण्यासाठी चांगला व्यवसाय सुरू करून, पुन्हा नवी सुरूवात करू शकतात.. या लेखात आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत..
तुम्ही चांगल्या शहरात राहत आहात. तुमचं घर प्रशस्त आहे. तर तुम्ही त्यातील काही खोल्या भाड्याने देऊन त्यातून चांगलं उत्पन्न मिळवू शकता. येणार्या पर्यटकांसाठी सजावट, स्थानिक प्रसिद्ध पदार्थ आणि उत्तम सुविधा ठेऊन तुम्ही त्यांना आकर्षित करू शकता. यासाठी तुम्हाला एखादा केअर टेकर ठेवावा लागू शकतो. मग बघा तुमचा वेळही आरामात निघून जाईल. शिवाय तुम्हाला पैसेही मिळतील..
तुम्ही जेवण बनवण्यात वस्ताद असल्यास एक छोटा फूड ट्रक घेऊन, तुम्ही त्यातून चांगली कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला चांगलं लोकेशन निवडावं लागले. विशेष म्हणजे मेन्यूत विविधता आणि चव भारी असल्यास तुमचा व्यवसाय चांगली वाढ प्राप्त करू शकतो. यासाठी तुम्हाला स्वच्छता व गुणवत्तेमध्ये लक्ष घालणं आवश्यक असणार आहे. याचा ताळमेळ बसला तर तुम्ही चांगला महिना मिळवू शकता.
तुमची आर्ट व क्राफ्टमध्ये रूची असल्यास त्यातून पैसे कमविण्याची ही संधी सोडू नका. तुम्ही कॅंडल, पेंटिंग, टेबल मॅट यासारखे प्राॅडक्ट बनवून त्या वस्तू ई-काॅमर्स प्लॅटफाॅर्मवर अपलोड करून थेट ग्राहकांना विकू शकता. जर तुम्हाला ते शक्य नसल्यास तुम्ही स्वत: वेबसाईट बनवून त्या वस्तू विकू शकता. यासाठी तुम्हाला थोडा खर्च करावा लागू शकतो. मात्र, यातून मिळणारा पैसाही मोठा असणार आहे. त्यामुळे तुम्ही हा पर्यायही निवडू शकता.
नोकरीत इतके वर्ष काढल्यानंतर आपल्याजवळ खूप अनुभव जमा झालेला असतो. त्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही कन्सल्टंट होऊ शकता. यामध्ये गुंतवणूक, प्रुफरिडिंग, रिअल इस्टेट किंवा तुम्ही ज्या क्षेत्रात काम केलं आहे. त्यावर आधारित तुमची कन्सल्टन्सी सुरू करू शकता. फ्रीलान्स कन्सल्टन्सी असल्यामुळे वेळेचं टेन्शन राहत नाही. शिवाय प्रत्येक प्रोजेक्टसाठी तुम्ही वेगवेगळी फीस घेऊ शकता.
तुम्हाला लेखनाची आवड असल्यास घरी बसून तुम्ही यातूनही चांगला पैसा मिळवू शकता. त्यासाठी तुम्ही स्वत:ची वेबसाईट तयार करू शकता. तसेच, त्यावर कंटेंट टाकू शकता. फ्रीलान्सचाही एक पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे. कारण, फ्रीलान्स प्रोजेक्टमधूनही चांगले पैसे मिळतात. त्यामुळे थोडं नेटवर्क वाढवून काम मिळवण्यासाठी तुम्हाला तयारी करावी लागणार आहे.
शिवाय तुम्ही महत्वाच्या विषयांवर पुस्तकही लिहू शकता. तसेच, तुमच्या रिटायरमेंटच्या अनुभवार आधारित लेखही लिहू शकता. ते जर वाचले गेलेत तर तुमची व्यवसायाची गाडी रुळावर यायला वेळ लागणार नाही. मग तुम्हाला त्यातून अॅड रेवेन्यू, एफिलिएट मार्केटिंग, स्पॉन्सरशिपद्वारे पैसे मिळवता येतात.
तुमचा एखाद्या विषयात हातखंडा असल्यास तो विषय तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन शिकवून चांगले पैसे कमवू शकता. आजघडीला अनेक विषयातील शिक्षकांची गरज दिसून येत आहे. त्यामुळे ज्या विषयांची जास्त मागणी आहे. त्या विषयांचे व्हिडिओ बनवून तुम्ही त्याचा कोर्स तयार करू शकता. तसेच, ऑनलाईन शिकवणी देऊनही पैसे कमवू शकता. यामुळे समाजात तुमचा सन्मानही वाढेल आणि पैसेही मिळतील..
रिटायरमेंट म्हणजे एकटेपणा, दडपण, घरी बसून काय करायचं?? या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळाली असतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे वर जे काही पर्याय आपण दिले आहेत. त्याचा थोडा विचार करून, आपल्याला जे सोपं वाटेल ते निवडून. आपण आपली रिटायरमेंट फायदेशीर व आनंददायी बनवू शकता. कारण, वरचे सगळे विषय आपल्या बजेटातीलच आहे. हे आपल्या लक्षात आलेच असेल.