गोल्ड लोन घ्यायचं आहे? मग ‘या’ गोष्टी माहिती हव्यात..

गोल्ड लोन घ्यायचं आहे? मग ‘या’ गोष्टी माहिती हव्यात..
10 Sep, 2025 View 7210 By Admin

गोल्ड लोन घ्यायचं आहे? मग ‘या’ गोष्टी माहिती हव्यात..

सोनं कालही, आजही आणि उद्याही तेवढाच जिव्हाळ्याचा विषय राहणार आहे. यात तिळमात्र शंका नाही. पण, सोन फक्त एवढ्यापुरतंच मर्यादित आहे का?? तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण, गरज कोणतीही असो घरी पैसे नसले की सोनच कामी येत. त्यामुळे पूर्वीपासूनच सोन गुंतवणूक म्हणून खरेदी केलं जातं. हे खरं असलं तरी त्याच्याशी खूप भावना जोडलेल्या असतात. म्हणून आजही बरेच जण सोन मोडण्यापेक्षा ते गहाण ठेवूनच कर्ज मिळवतात.. त्यामुळे आज आपण गोल्ड लोनविषयी सर्व काही जाणून घेणार आहोत..

आयुष्यात असे खूप काही प्रसंग येतात. ते आपल्याला आयुष्य कसं सहज करता येईल, हे शिकवत जातात. आपण लहानपणापासून एक गोष्ट बघत आलो आहोत. एखादी वस्तू घ्यायची असेल, शाळेची फी भरायची असेल किंवा थकलेला गाडीचा, घराचा हफ्ता भरायचा असेल.. पैसे नसतील तर अशा वेळी आईची किंवा बाबाची अंगठी, चैन बाहेर येतेच. घरातील चांगल्या-वाईट आर्थिक प्रसंगात सोनं प्रत्येक वेळी आपली वेळ मारून नेते.. त्यामुळे तुम्हीही अशाच एखाद्या गोष्टीसाठी सोन गहाण ठेऊन, पैसे घेत असाल तर काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे.

सोन गहाण ठेवणं म्हणजे काय?

घरात प्रत्येक वेळी पैसा असतोच असं नाही. त्यामुळे एखाद्या महत्वाच्या कामासाठी आपण बॅंका, वित्तीय संस्थां किंवा सोनाराजवळ सोन ठराविक अवधीसाठी गहाण ठेऊन पैसे मिळवतो. हे गोल्ड लोन म्हणजेच सुवर्ण कर्ज, या कर्जाला सुरक्षित कर्ज म्हणून ओखळल्या जाते. हे तुम्हाला सध्याच्या सोन्याच्या बाजार मूल्याच्या टक्केवारीनुसार दिल्या जाते. त्यालाच लोन टू रेश्यो ही म्हटल्या जाते.. म्हणजेच तुमच्या सोन्याच्या मूल्यानुसार तुम्हाला रक्कम दिल्या जाते.. सध्या ७५ टक्क्याच्या जवळपास रक्कम दिल्या जाते. तसेच, ठराविक अवधीनंतर तुम्ही पैसे परत केले की, तुम्हाला तुमचं सोनं परत दिल्या जाते. 

गोल्ड लोन कुठून घ्यायचं? 

सध्या मार्केटमध्ये गोल्ड लोन मिळायला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही बॅंका, नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) आणि पतसंस्था यांच्याकडून गोल्ड लोन घेऊ शकता. त्याआधी त्यांची विश्वासर्हता तपासणं आपली जबाबदारी आहे. शिवाय, तुम्हाला कोणत्या ठिकाणी लोन घेतल्यास फायदा होऊ शकतो. हे पाहण्यासाठी सर्व बॅंकाचे व्याजदर तपासा. जिथे तुम्हाला व्याजदर कमी पडत असेल, तिथून लोन घेण्याला प्राधान्य द्या..

गोल्डवर लोन किती मिळतं?

तुमच्याजवळ गोल्ड किती आहे, त्यानुसार तुम्हाला लोन किती द्यायचं हे ठरतं. तसेच, तुम्ही कोणत्या बॅंकेतून गोल्ड लोन घेत आहात. यावरही बऱ्याच गोष्टी निर्भर करतात. कारण, प्रत्येक बॅंकेचे नियम वेगवेगळे असतात. तुम्ही 5 हजार रुपयांपासून 2 कोटी रुपयांपर्यंत गोल्ड लोन मिळवू शकता. तसे पाहायला गेल्यास सोन्याच्या एकूण किमतीवर 75 टक्के रकमेचे कर्ज दिले जाते. म्हणजेच तुमच्या सोन्याची किंमत 1 लाख असेल तर तुम्हाला 75 हजार रुपये त्यावर मिळतील. तसेच, सोन्याची शुद्धता पाहून 22 कॅरेट व 24 कॅरेट सोनं यांचे दर वेगवेगळे असू शकतात. 

गोल्ड लोन फेडायचं कसं?

प्रत्येक जण महत्वाच्या कारणासाठीच सोनं गहाण ठेऊन पैसे घेतात. त्यामुळे त्यांच्या डोक्यात लोनं कसं फेडायचं, याचा आराखडा असतोच. कारण, हा पर्याय आपल्यालाच निवडणं आवश्यक असतं. यात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, मुख्यता ईएमआय किंवा एकदम रक्कम भरुन लोन बंद करू शकता. त्यामुळे लोन भरताना नियम पाळणं आवश्यक आहे. कारण एखादा जरी  ईएमआय थकला किंवा ठरलेली रक्कम भरली गेली नाही तर तुमच्याकडून बॅंक दंड आकारू शकते. 

कामाची गोष्ट

गोल्ड लोन हे गरजेच्या वेळी कामी येते, हे आपल्याला माहिती आहे. पण, आता त्याविषयी बऱ्याच बारीक-सारीक गोष्टी तुम्हाला माहिती झाल्या आहेत. त्यामुळे गोल्ड लोन घेण्याआधी त्यावर थोडं विचार मंथन करा. त्यानंतर आपल्याला कोणतं लोन फायदेशीर ठरेल, त्याचा विचार करूनच गोल्ड लोन घ्या.. हे शक्य नसल्यास व्यंकटेश मल्टीस्टेटच्या शाखेला भेट द्या, ते तुमच्या सोयीनुसार तुम्हाला गोल्ड लोनचे पर्याय सांगतिल.. शिवाय अधिक वेळ न घालवता त्वरित तुम्हाला गोल्ड लोन मिळवून देतील. त्यामुळे गोल्ड लोन हवं असल्यास आजच व्यंकटेशच्या शाखेला भेट द्या..



अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्या किंवा संपर्क करा.