Passive Income: पैशांचे हे ५ स्त्रोत तुमचं आयुष्य करणार चेंज

Passive Income: पैशांचे हे ५ स्त्रोत तुमचं आयुष्य करणार चेंज
15 Oct, 2025 View 7118 By Admin

Passive Income: पैशांचे हे ५ स्त्रोत तुमचं आयुष्य करणार चेंज

आयुष्य आरामात व्यतीत करायचं म्हटल्यावर पैसा लागतोच. काय बरोबर ना? यासाठीच प्रत्येक जण काबाडकष्ट करत असतो. मात्र, काही जण पैसे कमवायचा असा मार्ग तयार करतात. नंतर त्यांना काम करायचीही गरज पडत नाही. होय, तरीही पैसे मात्र मिळत राहतात. विश्वास बसत नाही ना? तुम्हीही असा मार्ग तयार करू शकता.. त्या मार्गाचं नाव आहे पॅसिव्ह इन्कम.. आज आपण याविषयी पूर्ण जाणून घेणार आहोत..
 
प्रत्येकाला आयुष्यात पैसे कमवायचे आहेत. खूप मोठ्ठ व्हायचं आहे. मात्र, हे एका दिवसात होत नसतं. त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. पण, हे आपण कायम स्वरूपी करू शकत नाही. म्हणून आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं आवश्यक आहे. हे मिळवायचं म्हटल्यावर उत्पन्नाचे विविध मार्ग तयार करणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही काम न करता पैसे कमवत राहू शकता. 

पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय??

पॅसिव्ह इन्कम म्हणजे पैसे कमविण्याचा असा स्त्रोत असतो, जिथे तुम्हाला काम न करता पैसे मिळत असतात. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. पैसे कमवायचं म्हटल्यावर काम तर करावंच लागणार. हेही बरोबर आहे. मात्र, तुम्ही पॅसिव्ह इन्कम म्हणजेच निष्क्रिय किंवा पर्यायी उत्पनाचा स्त्रोत तयार केला. 

तर तुम्ही जगात कुठेही असला तरी तुमचं पैसे कमवणं सुरूच राहणार आहे. विशेष म्हणजे तुम्ही जे काम करत असाल त्यावर याचा कोणताही परिणाम पडणार नाही. त्यामुळेच बरेच जण आता सेकंड इन्कम म्हणून पॅसिव्ह इन्कमवर लक्ष केंद्रित करत आहेत. कारण, यात फक्त एक वेळ गुंतवणूक करायची आहे. ती केल्यानंतर तुम्हाला न चुकता पैसे मिळत राहणार आहेत.  

पॅसिव्ह इन्कमचे स्त्रोत

आपल्या डोळ्या पुढेच पॅसिव्ह इन्कमचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. फक्त आपल्याला थोडं बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. चला तर कोणते पर्याय आपल्यासाठी बेस्ट ठरू शकते हे पाहूया.. 

पैसे व्याजाने द्या..

पैशांची गरज कोणाला कधीही पडू शकते. अशा वेळी जवळ पैसा नसला तर कर्ज काढणं हाच एकमेव मार्ग उरतो. पण, ते कर्जही लगेच मिळत नाही. म्हणून आपण हा व्यवसाय सुरू केल्यास यातून आपल्याला व्याजाचा चांगला पैसा मिळू शकतो. आधी खबरदारी म्हणून ज्या मित्रांना किंवा नातेवाईकांना गरज आहे, त्यानांच व्याजाने पैसे द्या. तसेच, पैसे द्यायच्या आधी ते पैसे परत करतील याची शक्यता वाटली तरच त्यांना पैसे द्या. त्यावर जे व्याज मिळेल हाही पॅसिव्ह इन्कमचा चांगला स्त्रोत ठरू शकतो.  

म्युच्युअल फंड आहे खास

सध्या प्रत्येक जण म्युच्युअल फंडाची जोरात चर्चा करत आहे. फक्त चर्चाच नाही तर गुंतवणूक वाढल्याचे आकडेही दैनिकांमधून वाचायला मिळत आहे. त्यामुळे तुम्हीही म्युच्युअल फंडाचा पर्याय पॅसिव्ह इन्कम म्हणून निवडू शकता. फक्त यासाठी तुम्हाला थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे. 

अभ्यास न करता थेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं टाळा, असं केल्यास आर्थिक फटका बसू शकतो. म्हणून तुम्ही मार्केटमधील तज्ज्ञांचा सल्ला घेऊनही गुंतवणूक करण्याचा मार्ग अवलंबू शकता. यातूनही तुम्ही चांगला रिटर्न मिळवू शकता. त्यामुळे तुम्ही गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडाचाही विचार करू शकता..  

रिअल इस्टेट आहे बेस्ट

सध्या रिअल इस्टेटचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे अनेक जणांना रेंटवर राहणे हाच पर्याय असतो. मात्र, तुमच्याजवळ पैसा असल्यास तुम्ही एखादा फ्लॅट घेऊन तो रेंटवर देऊ शकता. यामुळे तुम्हाला पैसा तर मिळणार आहेच, शिवाय तुमच्या मालकीची मालमत्ता होणार आहे. त्यामुळे थोडी माहिती काढून तुम्ही एखाद्या फ्लॅटमध्ये पैसे गुंतवून पॅसिव्ह इन्कम मिळवू शकता..   

फोटोग्रोफरसाठी आहे संधी

आधी फोटो काढणं खूप मर्यादित होतं. मात्र, आता प्रशिक्षण घेऊन चांगला फोटोग्राफर होता येत. तुम्ही म्हणाल त्या फोटोचं काय?? तर त्या फोटोवरूनही तुम्ही चांगला पैसा कमवू शकता. ते फोटो तुम्ही प्रसिद्ध साईट्सला विकून त्यांच्याकडून पैसे घेऊ शकता. तसेच, स्वत:च्या वेबसाईटवरुनही ते विकू शकता. यासाठी तुम्हाला कोणासोबतही चर्चा करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या फोटोची किंमत ठरवू शकता.. त्यामुळे तुम्ही चांगले फोटोग्राफर असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो.

शेअर बाजारात आहे नफा..

सगळ्यांना झटपट पैसा कमवायचा आहे. त्यामुळे प्रत्येक जण शेअर मार्केटकडे वळत आहे. पण, त्याआधी थोडा अभ्यास आवश्यक आहे. तसेच, पैसा वाढण्यासाठी तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी तो गुंतवावा लागतो. त्यामुळे तुमच्या सर्व गोष्टींचा विचार करून, तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा निर्णय घेऊ शकता. कारण, यात जेवढा पैसा आहे, तेवढीच जोखीमही आहे. त्यामुळे एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय गुंतवणूक करू नका. 

कामाची गोष्ट

आपण वर काही महत्वाचे पॅसिव्ह इन्कमचे स्त्रोत बघितले आहेत. आणखीही बरेच पर्याय उपलब्ध आहेत. पण, वरील पर्यायांवर तुम्ही सहज काम करू शकता. फक्त यासाठी काही वेळ देणं गरजेचं आहे. पण, एकदा तुम्हाला त्याचा अंदाज आला तर तुम्हाला पुन्हा मागे वळून बघण्याची गरज नाही.. हे तुमच्या लक्षात आले असेल अशी अपेक्षा आहे..



अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्या किंवा संपर्क करा.