पैसा असेल तरच व्यवसाय व्यवस्थित चालणार. कारण, व्यवसायात पैशांशिवाय कामे होत नाहीत. त्यामुळे पैशांचं योग्य व्यवस्थापन होण्यासाठी तुमच्या व्यवसायाचे बॅंकेत खाते असणंही आवश्यक आहे. तुम्ही नेहमी बॅंकेत जात असल्यास व्यवहार करण्यासाठी विविध काउंटर दिसत असतील. त्यात सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंटचे बोर्ड दिसले नाही तर नवलच. यातील करंट अकाउंटविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. याशिवाय तुमचा व्यवसाय सुरळीत चालूच शकणार नाही. हेच व्यवसायाचा खऱ्या अर्थान आत्मा आहे..
करंट अकाउंट म्हटल्यावर छोट्या व्यावसायिकांपासून मोठ्या उद्योजकापर्यंत सर्वांनाच याची आवश्यकता असते. कारण, हे अकाउंट व्यवसायांसाठीच तयार केलेलं आहे. त्यामुळे हे अकाउंट एखाद्याला वैयक्तिक वापरासाठी काढता येत नाही. तुमचा व्यवसाय असेल तरच तुम्हाला त्या व्यवसायाच्या नावावर या खात्याच्या फायद्यांचा लाभ घेता येणार आहे. या अकाउंटवरुन व्यावसायिकांना मोठ्या रकमेचे व्यवहार नेहमीच करावे लागतात.
त्यामुळे बॅंकांकडून या अकाउंटसाठी काही खास सुविधा दिल्या जातात. या अकाउंटला व्यवहाराच्या मर्यादा नसतात, तुम्ही या खात्यावर कितीही रक्कम जमा करू शकता व काढू शकता. या खात्यावर सहसा व्याज मिळत नाही. मात्र, तुम्ही व्यंकटेश मल्टीस्टेटचे फ्रीडम करंट अकाउंट उघडल्यास, तुम्हाला व्याजाचा लाभ घेता येणार आहे. याचबरोबर अन्य सुविधांचा लाभही तुम्हाला सहज मिळणार.
बऱ्याच बॅंका करंट अकाउंट असणाऱ्या ग्राहकाला अनेक सुविधा देतात. मात्र, करंट अकाउंटच्या पैशांवर व्याज देत नाही. तेच तुम्ही व्यंकटेश मल्टीस्टेटमध्ये फ्रीडम करंट अकाउंट उघडल्यास तुम्हाला आकर्षक व्याज मिळणार आहे. याशिवाय या खात्यातील रक्कम खातेदार कधीही काढून वापरू शकतो. तसेच, या खात्यातून व्यवहार करायला ही कोणतीच मर्यादा नाही. तसेच,या खात्यातून चेक देणे किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे पैसे ट्रान्सफर करणे यालाही कोणत्याच मर्यादा नाहीत.
करंट अकाउंट म्हणजेच चालू खाते. तुमच्या व्यवसायाला खऱ्या अर्थाने सोबत करणारे खाते. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार असाल किंवा आहे तो वाढवणार असाल, तर यासाठी तुम्हाला या खात्याची मोठ्या प्रमाणात मदत मिळेल. व्यावसायिकांना मजबूत करण्यासाठीच या खात्याचे डिझाईन करण्यात आले आहे.
जसे की, तुम्ही व्यवसाय वाढीसाठी कर्ज सुविधा घेऊ शकता. तसेच, NEFT व RTGS या सुविधांचा लाभही तुम्ही मोफत घेऊ शकणार आहात. याशिवाय तुम्हाला कॅश क्रेडिट कर्जही मिळवता येणार. संस्थेने ॲपची सुविधा दिली असल्यामुळे तुम्ही कधीही, कुठूनही व्यवहार करू शकणार आहात. त्यामुळे तुमच्या व्यवसायाला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची व्यंकटेश मल्टीस्टेटने पूर्ण खबरदारी घेतली आहे.
एवढे सगळे फायदे म्हटल्यावर तुम्हाला अकाउंट उघडण्याची इच्छा नक्कीच झाली असणार. तर यासाठी तुम्हाला काही महत्वाचे कागदपत्रं लागणार आहेत. यामध्ये तुमचे ओळखपत्र जसे की, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र (पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स), पत्त्याचा पुरावा (लाईट बिल), फोटो आणि तुमच्या व्यवसायाचा पुरावा म्हणून प्रमाणपत्र याचा समावेश असणार आहे. हे सर्व तुम्ही घरबसल्या करू शकणार आहात. त्यामुळे अकाउंट उघडायला तुम्हाला संस्थेच्या शाखेत जायची गरज नाही. यामुळे तुमचा वेळ व जाण्या-येण्याचा खर्चही वाचणार आहे..
व्यवसायात प्रत्येक क्षणी आपल्याला कोणत्या तरी गोष्टीसाठी पैसे लागत असतात. त्यामुळे तुमच्याजवळ करंट अकाउंट असणं खूप गरजेचं आहे. यामुळे तुमचा व्यवहार सोपा होतो. तसेच, पैशांची गरज पडल्यास तुम्ही कर्जही घेऊ शकता. विशेष म्हणजे व्यंकटेश मल्टीस्टेटमध्ये तुम्ही करंट अकाउंट उघडल्यास तुम्हाला पैशांवर व्याजही मिळणार आहे. याशिवाय तुमचा पैसा सुरक्षित हातात राहणार आहे.. म्हणून आजच व्यंकटेश मल्टीस्टेटच्या कोणत्याही शाखेत घरबसल्या खाते उघडा, तुमच्या व्यवसायाचा श्रीगणेशा करा…!