आजघडीला बहुतेकांना स्वत:च मालक व्हायचं आहे. म्हणून जो-तो व्यवसाय थाटायचं स्वप्न पाहत आहे. तुम्हीही असंच स्वप्न पाहत असून कमी खर्चात व्यवसाय सुरू करायचा असल्यास तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. कारण, आम्ही तुमच्यासाठी लोणच्याचा व्यवसाय घेऊन आलो आहोत.. जो तुम्ही एकदम कमी खर्चात सुरू करू शकता.. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया..
आज प्रत्येक जण नोकरी टिकवण्यासाठी धावपळ करत आहे. त्यात कामावरून कमी करण्याचं टेन्शन प्रत्येकालाच असतं. त्यामुळे बरेच जण आता व्यवसायाकडे वळत आहेत. मात्र, बहुतेकांची गाडी व्यवसाय निवडायच्या पलीकडं जातच नाही. म्हणून अनेकांचा व्यवसाय निवडायच्या आधीच कोलमडून जातो. म्हणून कमी बजेटमध्ये सुरू करता येईल. तसेच, त्यातून चांगला नफा मिळवता येईल, असाच हा व्यवसाय आहे. विशेष म्हणजे हळूहळू तुम्ही याला मोठ्या स्तरावर नेऊ शकता..
भारतीयांच्या जेवणात लोणचं नाही असं शक्यच नाही. कारण, लोणचं हा प्रत्येक भारतीयाच्या ताटातील एक महत्त्वाचा भाग आहे. आंब्याचे लोणचे असो, लिंबूचे असो किंवा मिरचीचे ते जेवणाची चव दुप्पट करते. याची मागणी प्रत्येक सीझनमध्ये आणि प्रत्येक घरात कायम असते. म्हणूनच, हा व्यवसाय कमी खर्च आणि सोप्या सेटअपसह सुरू करता येतो.
या व्यवसायाची सर्वात खास गोष्ट म्हणजे, तो तुम्ही घरातूनही सुरू करू शकता. जसे की, बाल्कनी, गच्ची किंवा स्टोअर रूम. यासाठी महागड्या शोरूमची किंवा मोठ्या फॅक्टरीची गरज पडत नाही.
जर तुम्हाला छोट्या स्तरावर सुरुवात करायची असेल, तर जवळपास ₹१०,००० ते ₹१५,००० मध्ये काम सुरू होऊ शकते. यात खालील गोष्टींचा समावेश असेल:
कच्चा माल (आंबा, लिंबू, मिरची इ.)
व्यवसाय तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही ₹१०,००० ची गुंतवणूक केली, तर दरमहा ₹३,००० ते ₹७,००० पर्यंत नफा मिळू शकतो. तसेच, ₹१५,००० ची गुंतवणूक केल्यास नफा वाढून ₹७,००० ते ₹१३,००० पर्यंत पोहोचतो. जसे ग्राहक आणि तुमच्या ब्रँडचे नाव सर्वत्र पोहचेल. तसे हे उत्पन्न दरमहा ₹२०,००० ते ₹४०,००० पर्यंत जाऊ शकते.
समजा, तुम्ही आंब्याचे लोणचे बनवता. तुमची अर्धा किलोची बरणी बाजारात ₹८० ते ₹१०० पर्यंत विकली जाते, तर त्याची उत्पादन किंमत फक्त ₹३५ ते ₹४५ असते. याचा अर्थ, तुम्हाला एका जारवर जवळपास ४०% ते ६०% पर्यंत थेट नफा मिळू शकतो.
आता तुम्ही म्हणाल, हे लोणचं करायला काहीच वेळ लागणार. हे खरं असलं तरी त्याची योग्य Marketing करणेही आवश्यक आहे. म्हणून सुरुवातीला स्थानिक दुकानदारांशी संपर्क साधा. तसेच, काही लोणच्याचे सॅम्पल आपल्या नातेवाईक, शेजारी व मित्रांना देऊन त्यांचा अभिप्राय घ्या. याचबरोबर सर्वांच्या खिशात असलेल्या सोशल मीडियाचा वापर करा. आजच्या परिस्थितीत कितीही दूर्गम भागातही आपण या सोशल मीडियाद्वारे पोहचू शकतो. यासाठी तुम्ही व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पेज बनवून ग्राहकांपर्यंत सहज पोहोचू शकता.
हा व्यवसाय हळूहळू जोर धरतो. पहिल्या २-३ महिन्यांत कमाई कमी राहील, पण जसा तुमचा नेटवर्क आणि मागणी वाढेल, तसतसे तुमचे उत्पन्न दरमहा ₹१५,००० ते ₹३०,००० पर्यंत होऊ शकते. म्हणजेच, वर्षभरात तुम्ही जवळपास ₹१.२ ते ₹३ लाख रुपये कमवू शकता. त्यामुळे अधिक विचार न करता आजच कामाला लागा.. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..