BIG Online Sale Offers : ऑनलाईन शॉपिंग करताय मग या गोष्टी लक्षात ठेवा..

BIG Online Sale Offers : ऑनलाईन शॉपिंग करताय मग या गोष्टी लक्षात ठेवा..
25 Jan, 2026 View 710 By Admin

BIG Online Sale Offers : ऑनलाईन शॉपिंग करताय मग या गोष्टी लक्षात ठेवा..

आजघडीला बहुतेकांना ऑनलाईन शॉपिंगच करायला आवडते. कारण, घरसबसल्या सगळं मागवता येतं. याचबरोबर मोठ्या ऑफर्सही असतात. असाच सेल प्रजासत्ताक दिन 2026 निमित्त Amazon आणि Flipkart या प्लॅटफॉर्म्सवर लाईव्ह झाला आहे. यामध्ये अनेक उत्पादनांवर 80% पर्यंत सवलत दिली जात असून iPhone, Samsung Galaxy आणि बजेट मोबाइल्सवर विशेष ऑफर्स उपलब्ध आहेत. मात्र, या उत्साहाच्या वातावरणात ऑनलाईन फसवणुकीचा धोकाही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. म्हणून खबरदारी घेणं आवश्यक आहे.. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.. 

ऑनलाईन फसवणुकीचे सावट

बँक कॅशबॅक आणि सुलभ EMI पर्यायांमुळे ग्राहक खरेदीकडे आकर्षित होत असतानाच, सायबर तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, याच काळात फसवणुकीचे प्रकार वाढतात. बनावट वेबसाईट्स, इंस्टाग्रामवरील खोट्या जाहिराती, फिशिंग लिंक्स आणि पेमेंट स्कॅम्स या काळात सर्वाधिक सक्रिय असतात. म्हणूनच Republic Day Sale ला ऑनलाईन फसवणुकीसाठी अधिक जोखमीचं मानल्या जाते.. याविषयी मनी कंट्रोलने माहिती दिली आहे.

सायबर इन्शुरन्स: काळाची गरज 

'बजाज जनरल इन्शुरन्स लिमिटेड'चे चीफ टेक्निकल ऑफिसर अमरनाथ सक्सेना यांच्या मते, खरेदीच्या या वातावरणाचा फायदा घेऊन स्कॅमर्स फिशिंग अटॅक आणि पेमेंट स्कॅम करतात. अशा वेळी सायबर इन्शुरन्स सामान्य लोकांसाठी मजबूत सुरक्षा कवच म्हणून काम करतो. 

सायबर इन्शुरन्स कसा मदत करतो?

सायबर इन्शुरन्स पॉलिसी अनधिकृत व्यवहार, फिशिंग आणि डेटा चोरीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाची भरपाई करते. जर तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती चोरीला गेली आणि त्याद्वारे चुकीचे व्यवहार झाले, तर पॉलिसीच्या अटींनुसार नुकसान भरपाई मिळू शकते. 

इन्शुरन्स कधी लागू होत नाही? 

'पॉलिसीबाझार फॉर बिझनेस'चे सायबर इन्शुरन्स हेड अंकित गुप्ता सांगतात की, जर नुकसान तुमच्या स्वतःच्या निष्काळजीपणामुळे झाले असेल, तर विमा संरक्षण मिळत नाही. उदा. स्वतःहून कोणाला OTP, PIN किंवा पासवर्ड सांगणे किंवा संशयास्पद कॉलवर माहिती देणे. 

फसवणूक झाल्यास काय करावे? 

1. संशयास्पद व्यवहार दिसल्यास त्वरित बँकेला कळवा आणि कार्ड ब्लॉक करा. 

2. सरकारी सायबर क्राईम पोर्टल किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा. 

3. विम्याचा दावा करण्यासाठी सहसा 24 ते 48 तासांच्या आत विमा कंपनीला माहिती देणे आवश्यक असते. 

4.ऑनलाइन स्कॅमर्सपासून वाचण्याचे सोपे मार्ग 

5.सार्वजनिक Wi-Fi वर कधीही पेमेंट करू नका. 

6.पेमेंट करण्यापूर्वी वेबसाईटचे URL नीट तपासा. 

7.अनोळखी लिंक किंवा सोशल मीडियावरील ऑफर्सवर क्लिक करू नका. 

8.मजबूत पासवर्ड वापरा आणि मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशनऑन ठेवा. 

 कार्ड वापरण्याची स्मार्ट पद्धत 

अमरनाथ सक्सेना सल्ला देतात की, क्रेडिट कार्डची लिमिट नेहमी कमी ठेवावी. जेव्हा जास्त खर्च करायचा असेल तेव्हाच ॲपद्वारे ती वाढवावी आणि व्यवहार पूर्ण झाल्यावर पुन्हा कमी करावी. तसेच, परदेशात जाणार नसाल तर 'इंटरनॅशनल व्यवहारा'चा पर्याय बंद ठेवावा. 

कामाची गोष्ट 

सण उत्सव म्हटल्यावर ऑफर्सचा अधिक भडिमार असतो. त्यामुळे अनेक जण खरेदीच्या नादात नको त्या लिंक्स क्लिक करतात. या गोष्टी टाळल्यास तसेच कोणत्याही ऑफर्सला बळी न पडल्यास तुम्ही स्वत:चा बचाव करू शकता. याचबरोबर स्कॅमर्सच्या डावाला उधळून लावू शकता.



अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्या किंवा संपर्क करा.