आजच्या डिजिटल युगात स्कॅमर्स विविध आयडियांचा वापर करून, कोणालाही सहज गंडा घालत आहेत. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे. कारण, हे स्कॅमर्स कमी वेळात अधिक रिटर्न देण्याच्या आश्वासनाचा जास्त वापर करत असल्याचे दिसनू येत आहेत. कारण, प्रत्येकालाच झटपट श्रीमंत व्हायचं आहे. त्यामुळे या गोष्टीचा हे स्कॅमर्स फायदा घेत आहेत. त्यामुळेच आपल्या मेहनतीचा पैसा सुरक्षित ठेवायचा असल्यास काही गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तेव्हाच तुमची गुंतवणूक सुरक्षित आणि वाढती राहू शकते.. चला तर मग पाहूया..
स्कॅमर्स फसवणूक करण्यासाठी आकर्षक योजनांची पॅकेजिंग करतात. ते फक्त एवढ्यावरच थांबत नाहीत, अधिक रिटर्न्सचे आश्वासनही देतात. तसेच, एकदा तुम्ही त्यांच्या जाळ्यात फसल्यावर लवकर निर्णय घेण्यासाठीही दबाव टाकतात. खालील गोष्टी तुमच्यासोबत घडत असल्यास वेळेत खबरदारी घ्या..!
या सर्व गोष्टी धोक्याची घंटा आहेत. त्यामुळे आपल्या मेहनतीचा पैसा कुठेही गुंतवण्याआधी प्रत्येक गुंतवणुकदाराला वरील गोष्टी कायम लक्षात ठेवणं आवश्यक आहे. नाही तर तुम्हाला आर्थिक फटका बसल्याशिवाय राहणार नाही.
कोणीही असो कमी वेळात तुम्हाला श्रीमंत होण्याचं म्हणजेच जास्त रिटर्न मिळवून देण्याची लालूच दाखवत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण, अशी कोणतीही योजना नाही, जी तुम्हाला अल्पावधित श्रीमंत करेल. ते स्कॅमर्स तुमचा विश्वास जिंकण्यासाठी असं खोट बोलू शकतात.
खरं काय?: यशस्वी गुंतवणुकीसाठी संयम आणि योग्य माहिती आवश्यक असते. हमखास नफा देणाऱ्या योजना संशयास्पद असतात. (खरे तर, निश्चित रिटर्न्सचे पर्याय म्हणजे फिक्स डिपॉझिट्स आणि बॉन्ड्स एवढेच आहेत.)
गुंतवणुकीत पारदर्शकता असणं ही खरी विश्वासार्हता आहे. मात्र, स्कॅमर महत्वाची माहिती लपवतात. जसे की छुपे शुल्क, कमिशन किंवा गुंतवणुकीचं खरं स्वरूप.
खरं काय?: असं कधी जाणवलं, तर गुंतवणूक करण्याआधी सर्व माहिती असलेली कागदपत्रे मागा. तसेच, ती योजना जास्त गुंतागुंतीची वाटली, तर ती टाळणेच योग्य.
स्कॅमर्स लोकांना अनधिकृत ट्रेडिंग अॅप डाउनलोड करण्यास सांगतात. तसेच,लोकांचा त्या अॅपवर विश्वास बसावा, त्यांनी अधिक पैसा टाकावा. म्हणून, बनावट नफा किंवा बॅलन्स दाखवतात.
खरं काय?: फक्त अधिकृत व परवाना असलेल्या ब्रोकर्ससहच व्यवहार करा. तसेच, अॅप्स फक्त अधिकृत स्त्रोतांमधूनच डाउनलोड करा. थेट कॉल्स किंवा मेसेजद्वारे आलेल्या अॅप्सकडे दुर्लक्ष करा. नाही तर तुमचं खातं खाली होऊ शकतं..
गुंतवणुकीच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करण्यासाठी ज्ञान, शिस्त आणि दीर्घकालीन दृष्टी आवश्यक असते. रिसर्च का आवश्यक आहे, चला पाहू :
स्कॅमर्स भीती किंवा लालूच दाखवून पुढच्या लोकांना निर्णय घ्यायला भाग पाडतात. त्यामुळे माहितीपूर्ण राहून, सखोल रिसर्च करून आणि सुरक्षित बँकिंग टूल्सचा योग्य वापर करून, तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. तसेच, आर्थिक फसवणुकीपासूनही बचाव करू शकता. लक्षात ठेवा, गुंतवणूक ही एक मॅरेथॉन आहे, स्प्रिंट नाही.
कुठलाही संशयास्पद प्रकार किंवा अडचण असल्यास, व्यंकटेश मल्टीस्टेटच्या 1800 5322 111 या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क करू शकता.. गुंतवणूक करण्याआधी विचारा अंती घेतलेला निर्णय फायद्याचा ठरू शकतो.. हे कायम लक्षात ठेवा..