व्यंकटेश मल्टीस्टेट (Venkatesh Multistate) गेल्या १२ वर्षांपासून ग्राहकांना सर्व बॅंकिंग (Banking) सुविधा वेळेत पुरवण्याचं कार्य मोठ्या उत्साहाने करत आहे. आज संस्थेच्या ५६ शाखा असून तीन लाखांहून अधिक समाधानी ग्राहक सेवा घेत आहेत. ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी ही संस्था अविरत कार्य करत आहे. म्हणूनच अल्पावधीत व्यंकटेश मल्टीस्टेट हे नाव घरोघरी पोहचले आहे.. चला तर मग व्यंकटेश मल्टीस्टेटविषयी जाणून घेऊया..
व्यवसाय तर सुरू करायचा आहे, पण पैसा कोण देणार?? कारण, कोणत्याही बॅंकेत कर्जासाठी गेल्यावर प्रत्येक जण त्यांच्या नियमात बसण्याची शक्यता खूपच कमी असते. या प्रश्नाच्या उत्तरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काही प्रगतशील विचारांच्या तरुणांनी एकत्र येत, बारा वर्षांपूर्वी श्री व्यंकटेश मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली.
संस्थेने ज्या नागरिकांना काही नवीन सुरू करायचं आहे. अशा प्रत्येकाला प्रोत्साहन देत आर्थिक सहाय्य केलं. तसेच, शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिक यांनाही त्यांच्या क्षेत्राचा विस्तार आणि सुधार करण्यासाठी प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य केलं. त्यामुळे नागरिकांचा संस्थेवरील विश्वास आणखी दृढ झाला. संस्थेने प्रत्येकाची गरज ओळखून त्यांना पुढे जाण्यासाठी हातभार लावला.
संस्थेच्या विश्वसनीय व सर्वोत्तम सेवांमुळे आजघडीला शाखांचा आकडा ४८ पर्यंत पोहचला असून तीन लाखांहून अधिक समाधानी ग्राहक सेवा घेत आहे.
आपण काळासोबत चाललो नाही तर मागे राहू.. या उक्तीप्रमाणे संस्थेने काळासोबत चालणं महत्वाचं असल्याचं हेरून, त्यानुसार स्वत :मध्ये अनेक बदल करून घेतले. यातील महत्वाचा बदल म्हणजे डिजिटल क्षेत्रात घेतलेला प्रवेश. याच बदलाबरोबर संस्था डिजिटल सुविधा देणारी पहिली मल्टीस्टेट ठरली आहे.
राष्ट्रीय बॅंका ज्या डिजिटल सुविधा देत आहेत. त्याच सुविधा व्यंकटेश मल्टीस्टेटही देत आहे. यामुळे आता ग्राहकांना सर्व सुविधांचा लाभ घरबसल्या घेता येत आहे. यामध्ये सेव्हिंग अकाउंट (Saving Account), करंट अकाउंट (Current Account ), मुदत ठेव योजना (Fixed Deposit), आवर्ती ठेव योजना (Recurring Deposit), फ्युचर बाॅक्स (Future Box ) आणि पिग्मी अकाउंटचा (Pigmy Account) समावेश आहे. यावर मिळणारे आकर्षक व्याज ग्राहकांना सुरक्षेसह अधिक रिटर्न मिळवून देत आहे.
याचबरोबर सर्व प्रकारची कर्जे अत्यंत अल्पदरात संस्था उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे अनेकांना आपला व्यवसाय वाढवण्यास व नव्याने सुरू करण्यास मोठा आधार मिळत आहे..
व्यंकटेश मल्टीस्टेटने स्थापनेपासूनच समाजासाठी काही तरी वेगळं करायचा निर्धार केला होता. स्थापनेच्या काही दिवसांपासूनच संस्थेच्या वतीने वेळोवेळी आरोग्य शिबिरं राबवण्यात येत आहे. यामध्ये मोफत नेत्र तपासणी, सर्व रोग निदान शिबिर, मधुमेह आणि बी.पी. तपासणी यांचा समावेश आहे. ही शिबिरं प्रत्येक शाखेच्या वतीने दर महिन्याला मोठ्या उत्साहात राबवण्यात येत आहेत. यामुळे अनेक गरजवंतांना फायदा होत आहे.
प्रत्येकाला शहराच्या ठिकाणी जाऊन, उपचार करून घेणं शक्य नसतं. मात्र, व्यंकटेशच्या या सुविधेमुळे अनेकांना घरपोच सेवा मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना आजारातून बरं व्हायला मदत होत, असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.
बॅंकिंगच्या सुविधा अजूनही गरजू लोकांना घेता येत नाही आहे. त्यामुळे त्या नागरिकांना स्वत:ची प्रगती करण्यात अडथळे येत आहेत. ते अडथळे येऊ नये, यासाठी त्यांना आर्थिकरित्या सक्षम करून, बुलंद भारत निर्मितीचे व्हिजन संस्थेने ठरवले आहे. याचबरोबर २०३५ पर्यंत १ कोटी भारतीय कुटुंबियांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याचं मिशन संस्थेने सेट केले आहे.. हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा आपण सर्व जण एकत्र येऊ..
म्हणून आजच तुमच्या गरजेनुसार सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, मुदत ठेव योजना (FD), आवर्ती ठेव योजना (RD), फ्युचर बाॅक्स आणि पिग्मी अकाउंट ओपन करा, बुलंद भारताच्या निर्मितीसाठी योगदान द्या…