पैसा कमविण्यासाठी प्रत्येक जण मेहनत करतो, यात दुमत नाही. पण, पैसा गुंतवायची वेळ आली की, अनेक जण गोंधळात पडतात. वास्तविक पाहायला गेल्यास भारतात गुंतवणुकीसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, मेहनतीचा पैसा सुरक्षित ठेवायचा असला, तर आजही अनेकांची पहिली पसंत बॅंकेतील मुदत ठेवीलाच आहे.. तर आज आपण मुदत ठेवीविषयी संपूर्ण जाणून घेणार आहोत.
मुदत ठेव ही बँका व पोस्ट ऑफिसकडून राबवली जाणारी सर्वांत लोकप्रिय योजना म्हणून ओळखली जाते. कारण, मुदत ठेवीत पैसा तर सुरक्षित राहतोच, शिवाय ठरावीक व्याजदरही मुदतीनंतर मिळतो. यामुळेच मुदत ठेवीत केलेली गुंतवणूक सुरक्षित, स्थिर व कमी जोखमीची मानली जाते.
यासाठी ज्या बँकेत तुम्हाला मुदत ठेव करायची आहे, तिचे सेव्हिंग/करंट अकाउंट असणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार मुदत ठेवीचे उद्दिष्ट ठरवून रक्कम व मुदत निवडू शकता. मुदत ठेवीची मुदत 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत असू शकते. मुदत ठेव हमखास परताव्यासाठी अधिकी लोकप्रिय आहे.
मुदत ठेवीत गुंतवणूक करायचा विचार करत असल्यास याचा सर्वांत मोठा फायदा माहिती हवा. तो फायदा आहे ठरावीक व्याजदर, जो बचत खात्याच्या व्याजापेक्षा अधिक असतो. त्यामुळे, तुमचे पैसे बचत खात्यात तसेच पडून असल्यास तुम्ही ते मुदत ठेवीत गुंतवून अधिक परतावा मिळवू शकता.
विशेष म्हणजे बॅंक मुदत ठेवीचा व्याजदर आधीच निश्चित करते, तो मुदत ठेवीची मुदत संपेपर्यंत बदलत नाही. त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला किती परतावा मिळू शकतो, हे तुम्हाला आधीच माहिती होते. त्यानुसार मग तुम्ही पुढचे प्लॅन सहज करू शकता. अजून एक गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे.
ती म्हणजे तुमच्या मुदत ठेवीच्या व्याजाच्या उत्पन्नावर आयकर नियमानुसार टीडीएस (Tax Deducted at Source) कापला जातो. जर तुम्ही सामान्य किंवा ज्येष्ठ गुंतवणुकदार असाल तर तुमच्या गुंतवणुकीवरील व्याज अनुक्रमे 40000 व 50000 हून अधिक गेल्यास तुम्हाला कर भरावा लागतो.
मुदत ठेव केल्यावर हमखास परतावा मिळतो. पण, याचबरोबर तुम्ही आणखी एका सुविधेचा लाभ घेऊ शकता. कारण, मुदत ठेवीत गुंतवणूक केल्यास तुम्हाला व्याज मिळवण्याच्या मुदतीचे दोन पर्याय दिले आहेत. यामध्ये मासिक किंवा तिमाहीचाही समावेश असतो. तुमच्या सोयीनुसार व्याज जमा होण्याचा एक पर्याय तुम्ही निवडू शकता.
याशिवाय, तुम्हाला जर निधीची गरज फक्त मुदतीच्या शेवटी असेल, तर तुम्ही ‘पुनर्गुंतवणूक योजने’चा (Reinvestment Plan) पर्यायही निवडू शकतात. अशा प्रकारे, व्याजाची रक्कम पुन्हा त्यांच्या मूळ ठेवीमध्ये गुंतवली जाते आणि मुदतीच्या शेवटी मोठा परतावा मिळतो.
मुदत ठेवीत (FD) गुंतवणूक केली म्हटल्यावर तुम्हाला तिच्या सुरक्षेची काळजी करण्याची गरज नाही. कारण, मार्केटच्या कोणत्याही परिस्थितीचा मुदत ठेवीवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्ही कधीही एक मोठी रक्कम मुदत ठेवीत गुंतवू शकता. याशिवाय, मुदत ठेवीचं अकाउंट उघडण्याची प्रक्रियाही अतिशय सुलभ आणि जलद आहे.
तुमचे अकाउंट व्यंकटेश मल्टीस्टेटच्या शाखेमध्ये असल्यास, तुम्ही साधा अर्ज भरुन आपली रक्कम बचत खात्यातून मुदत ठेव खात्यात ट्रान्सफर करु शकता. समजा तुमचे अकाउंट शाखेत नसल्यास, तुम्ही घरबसल्या सेव्हिंग अकाउंट उघडून, शाखेत अर्ज भरुन मुदत ठेव करू शकता.
कधी पैशाची गरज लागेल, हे कोणालाच सांगत येत नाही. त्यामुळे अशा वेळी पैसे लागत असल्यास, कोणत्याही बॅंकेतील मुदत ठेव तुमच्या कामी येऊ शकते. फक्त तुमची त्या बॅंकेत मुदत ठेव असणं आवश्यक आहे. होय, कारण तुमच्या मुदत ठेवीवर बॅंक तुम्हाला 90 टक्क्यांपर्यंत सहज कर्ज देऊ शकते.
पण, यासाठी ते तुमच्या मुदत ठेवीला तारण म्हणून ठेवतात. अशा पद्धतीने कर्ज घेतल्यास, तुम्हाला ईएमआय भरण्याची चिंता राहणार नाही. तुम्हाला फक्त तुमच्या मुदत ठेवीची मुदत संपण्याआधी कर्जाचे पैसे जमा करावे लागतील. शिवाय तुम्ही त्यांचे ग्राहक असल्यामुळे तुम्हाला कर्ज त्वरित मिळेल.
मुदत ठेवीत आजही अनेक जण गुंतवणूक करत आहेत. मात्र, त्यांना हे माहिती नाही की, मुदत ठेवीवरही आपण कर सवलत मिळवू शकतो. सेक्शन 80 सीच्या तरतुदीनुसार काही योजनांत आपण 1.50 लाखांपर्यंत आयकरात सवलत मिळवू शकतो.
पण, ही सवलत मिळवण्यासाठी गुंतवणूक कमीत कमी 5 वर्ष व त्यापेक्षा अधिक मुदतीची असणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे ही रक्कम गुंतवल्यावर ती लॉक-ईनमध्येच राहते. त्यामुळे ती रक्कम लॉक-ईनची मुदत पूर्ण होईपर्यंत काढता येत नाही. म्हणून गुंतवणूक करण्याआधी ही बाब लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
प्रत्येकाची आर्थिक उद्दिष्टे वेगवेगळी असू शकतात. पण मुदत ठेवीत (FD) गुंतवणूक केल्याने आपल्या दीर्घकालीन उद्दिष्टांजवळ आपण सहज पोहोचू शकतो. कारण, आपली रक्कम सुरक्षित राहून, अधिक परतावा देते. त्याचबरोबर महत्वाच्या गरजांसाठी उपयुक्त ठरू शकते. तुम्ही जर पाच वर्षांचे उद्दिष्ट ठेवून गुंतवणूक करत असाल, तर मुलांच्या शिक्षणाचे शुल्क, तुमच्या नवीन घरासाठी किंवा अन्य आर्थिक उद्दिष्टांसाठी मुदत ठेव कामी येऊ शकते.
मुदत ठेव गुंतवणुकीचे आपण फायदे पाहिले आहेत. त्यामुळे आयुष्यात येणारे आर्थिक प्रसंग सहजतेने हाताळायचे असल्यास, प्रत्येकाचीच मुदत ठेव असणं गरजेचं आहे. म्हणून आपली उद्दिष्ट, आपल्याजवळील पैसा या सर्व गोष्टींचा विचार करून, आजच विश्वसनीय व्यंकटेश मल्टीस्टेटच्या कोणत्याही शाखेत मुदत ठेवीचा श्रीगणेशा करा.. आयुष्याचा आनंद घ्या...