कर्ज योजना

gold loan
gold loan
gold loan

जितकं सोनं, तितकं कर्ज! (सोने तारण कर्ज)

पैशांची गरज ही कधी सांगून येत नसते. पण अशा अचानक ओढवलेल्या अडचणीत पैशांचं सोंग आणता येत नाही. तुमच्या अडचणीच्या काळात श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी तुमच्या पाठीशी उभी राहते खंबीरपणे. अशा कठीण परिस्थितीमध्ये संस्थेत सोनेतारण ठेवा आणि जितकं सोनं तितकं कर्ज मिळवा, तेही कमी कागदपत्रांच्या मदतीने अत्यंत कमी वेळेत आणि कुठल्याही प्रोसेसिंग फीस शिवाय! कारण आम्ही जाणतो तुमची गरज. या सोने तारण कर्जाबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.

  • झटपट कर्ज मंजुरी
  • ०% प्रोसेसिंग फी
  • प्रति तोळा सर्वाधिक रक्कम

समृद्ध शेतकरी कर्ज योजना

अवघ्या जगासाठी अन्नधान्य पिकवतांना बळीराजा अनेक आर्थिक अडचणींना सामोरा जातो. त्यामुळे बऱ्याचदा त्याला स्वतःसाठीही पैसे अपुरे पडतात. याच अडचणींचा विचार करून पैशांअभावी शेतकऱ्यांची प्रगती थांबू नये या हेतूने श्री व्यंकटेश मल्टीस्टेटने सुरू केली आहे 'समृद्ध शेतकरी कर्ज योजना'! या योजनेद्वारे शेतकऱ्यांना रु. २ लाखांपर्यंत अत्यंत कमी कागदपत्रांसह त्वरित कर्ज उपलब्ध करून दिले जाते. शिवाय या योजनेत शेतकऱ्यांना मासिक हप्त्याचे बंधन राहत नाही. सोबतच संपूर्ण कर्जाची रक्कम एकाच वेळी फेडण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते.
आता बळीराजाच्या घरी येणार आनंदाची सुगी! समृद्ध शेतकरी कर्ज योजनेबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी 1800 5322 811 या क्रमांकावर संपर्क साधा अथवा आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

  • कमीत कमी दिवसांत कर्ज मंजुरी
  • ५ लाखांपर्यत कर्ज पाच वर्षांपर्यंत मुदत
  • शेतीच्या उत्पन्नानुसार कर्ज हफ्ता भरण्याची सुविधा
  • दर मार्चला एकरकमी कर्ज भरण्याची आवश्यकता नाही.
agriculture loan scheme
agriculture loan scheme
agriculture loan scheme
The Tarn Loan
The Tarn Loan
The Tarn Loan

मुदत ठेव तारण कर्ज

आता छोट्या आर्थिक अडचणींमध्ये मोठे कर्ज डोक्यावर घेण्याची आवश्यकता नाही, कारण श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी तुम्हाला उपलब्ध करून देते तुमच्या संस्थेमधील असलेल्या ठेवीवर मुदत ठेव तारण कर्ज; ज्यात तुम्हाला कर्जाच्या कालावधीत तुमच्या ठेवीवर व्याजही मिळते आणि असलेल्या ठेवीवर तात्काळ कर्जही उपलब्ध होते. यामुळे तुमची बचत सुरक्षित राहते आणि तुमची आर्थिक गरज देखील पूर्ण होते.
कमीत कमी कागदपत्रात ताबडतोब मुदत ठेव तारण कर्ज घेण्यासाठी अथवा त्याबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

महिला विकास कर्ज

महिला सबलीकरण, महिला व्यावसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी, श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी कायम तत्पर असते आणि म्हणूनच संस्था बचत गटांना देते महिला बचत गट कर्ज. आज असंख्य महिला बचत गट संस्था जोमाने कार्यरत आहेत, स्वबळावर एक नवा व्यवसाय उभा करीत आहेत. त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी देते अत्यंत कमी व्याजदरात त्वरित कर्ज मंजुरी.
व्यवसाय वृद्धीसाठी अथवा स्वप्नपूर्तीसाठी महिला बचत गट कर्ज हवे असल्यास आपल्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा 1800 5322 811 वर कॉल करा.

  • महिला विकास कर्ज योजना
  • महिलांना व्यवसाय वाढीसाठी कर्ज
  • कमीत कमी कागदपत्रे
  • तात्काळ कर्ज मंजुरी
women development loan
women development loan
women development loan
Business Loan
Business Loan
Business Loan

व्यावसायिक कर्ज

व्यवसाय म्हटला की हाताशी भांडवल हवं असतं, मात्र या व्यवहाराच्या जगात अडकलेले पैसे वेळेवर मिळतीलच याची खात्री नाही. श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटीच्या वतीने तुम्हाला व्यावसायिक कर्ज तात्काळ उपलब्ध करून देण्याची हमी आम्ही देतो. व्यवसाय छोटा असो किंवा मोठा, तुमच्या गरजेच्या वेळी संस्था देईल तुम्हाला त्वरित आणि तात्काळ कर्ज, कारण आम्ही जाणतो व्यवसायात वेळीच भांडवल गुंतवले तरंच फायद्याची हमी असते. तुम्ही जर एक व्यावसायिक असाल आणि तुम्हाला काही कालावधीसाठी पैशांची गरज असेल तर व्यावसायिक कर्जासाठी किंवा त्याबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.

  • UPI QR CODE वापरा व मिळवा
  • रू. ५ लाखापर्यंत व्यावसायिक कर्ज
  • दैनंदिन व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांना कर्ज सुविधा
  • छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना कर्ज सुविधा
  • कमीत कमी व्याजदर. कमीत कमी कागदपत्रे.
  • अल्पावधीत कर्ज मंजुरी

सोने खरेदी कर्ज

सोने खरेदी प्रत्येक सौभाग्यवतीचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यासाठी त्यांची तशी तयारीही सुरू असते. मात्र, एखादा मोठा सोन्याचा दागिना घ्यायचा म्हटल्यावर जास्त पैसे लागणार. हो की नाही? पण, आता तुम्हाला सोने खरेदी करण्यासाठी काळजी करण्याची अजिबात गरज नाही. फक्त तुमची सोने खरेदी करण्याची इच्छा असली पाहिजे. कारण, व्यंकटेश मल्टीस्टेट घेऊन आली आहे ‘व्यंकटेश सुवर्णपूर्ती योजना’ या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला सहज सोने खरेदीसाठी कर्ज घेता येणार आहे. तेही अगदी सोप्या, सरळ आणि सुलभ प्रक्रियेद्वारे. मग कोणाची वाट पाहताय?

Gold Loan
Gold Loan
Gold Loan
Mobile Loan
Mobile Loan
Mobile Loan

मोबाईल खरेदी कर्ज

मोबाईल काळाची गरज आहे. आजघडीला तुमची बऱ्यापैकी सर्वच काम मोबाईलवरुनच होत आहे. मग ते लाईट बिल असो की बसची बुकिंग. त्यामुळे मोबाईल असणं आवश्यक झाले आहे. पण, सर्वांनाच तो घेता येईल हे शक्य नाही.

म्हणूनच सर्वसामान्यांची गरज ओळखून व्यंकटेश मल्टीस्टेट सादर करत आहे मोबाईल खरेदी कर्ज योजना… या योजनेच्या माध्यमातून अगदी मोजकेच कागदपत्रं जमा करुन लोन मिळवू शकणार आहात. तसेच, तुमच्या सोयीनुसार हप्तेही निवडू शकणार आहात. त्यामुळे ही संधी दवडू नका. तुमच्या जवळच्या शाखेशी आजच संपर्क करा.

  • कमी कागदपत्रं
  • कमी व्याजदर
  • सुलभ परतफेड पर्याय
  • त्वरित पैसे खात्यात

शैक्षणिक कर्ज

आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचं म्हटल्यावर शिक्षण आवश्यक आहे. फक्त शिक्षणच नाहीतर आपले ध्येय गाठण्यासाठी उच्च शिक्षणही तेवढेच आवश्यक आहे. यासाठी सर्वजण सक्षम असतातच असे नाही. पण, ज्यांना उच्च शिक्षण घेऊन आपले ध्येय पूर्ण करायचे आहे.

अशा विद्यार्थ्यांना आता काळजी करण्याची गरज नाही. त्या विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यंकटेश मल्टीस्टेट सादर करत आहे शैक्षणिक कर्ज योजना. या योजनेच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी कर्ज घेता येणार आहे. तसेच, या कर्जासाठी व्याजदरही कमी असणार आहे. याशिवाय तुम्हाला सुलभ परतफेड पर्यायासह विनातारण कर्ज घेता येणार आहे. त्यामुळे ही संधी दवडू नका. तुमच्या जवळच्या शाखेशी आजच संपर्क करा.

  • कमीत कमी व्याजदर
  • सुलभ परतफेड
  • विनातारण उपलब्ध
  • त्वरित पैसे खात्यात
Education Loan
Education Loan
Education Loan

मॉर्गेज कर्ज

अडचण मोठी असो अथवा लहान, तुमच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणात श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी देईल तुमची साथ! तुमच्या अडचणीच्या काळात आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ तारणी कर्ज, जेणेकरून तुमच्या गरजा व्हाव्या वेळेत पूर्ण!
आपल्या स्थावर मालमत्तेवर तारणी कर्ज घेण्यासाठी अथवा त्याबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

Mortgage Loan
Mortgage Loan
Mortgage Loan
Personal Loan
Personal Loan
Personal Loan

वैयक्तिक कर्ज

या व्यवहारी जगात लहानसहान आर्थिक अडचणींमुळे मोठं नुकसान सोसावं लागतं. अनेकदा आपल्याला काही वैयक्तिक कारणास्तव अल्पावधीसाठी पैशांची गरज असते. मात्र वेळीच पैसे न मिळाल्याने मोठे नुकसान सोसावे लागते. पण आता नाही! तुमची हीच गरज लक्षात घेऊन श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी तुम्हाला उपलब्ध करून देते अल्प व दीर्घ काळासाठी वैयक्तिक कर्ज. हे कर्ज देखील कमीत कमी कागदपत्रात तात्काळ मंजूर करून दिले जाते. ज्यामुळे वेळीच तुमची गरज पूर्ण होते! तुमच्या वैयक्तिक गरजांना आम्ही देऊ आधार! वैयक्तिक कर्जाबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.

loan
loan
loan

पगार तारण कर्ज

आपल्या तात्काळ गरजा भागवणं असो किंवा आपली छोटी-मोठी स्वप्नं असोत, पैसा हाताशी हवाच असतो. परंतु सर्वसामान्य नोकरदार बंधूंना आपल्याच कामाच्या पैशांसाठी अर्थात पगारासाठी महिनाभर वाट पाहावी लागते. गरजेच्या वेळी हाताशी पैसे नसल्यास मोठी तारांबळ होते. अशा वेळी तुम्हाला साथ देते श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी! आम्ही जाणतो तुमच्या स्वप्नांचं आणि गरजांचं महत्व आणि म्हणूनच संस्था तुम्हाला उपलब्ध करून देते पगार तारण कर्ज; ज्यात तुमच्या येणाऱ्या पगारावर तुम्हाला कमीत कमी कागदपत्रांवर तात्काळ कर्ज मिळवून दिले जाते व वेळीच तुमची गरज पूर्ण करण्यासाठी हातभार लावला जातो.
तुम्ही नोकरदार असाल तर गरजेच्या वेळी पगाराची वाट पाहू नका. पगार तारण कर्जासाठी व त्याबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.

Car loan
Car loan
Car loan

वाहन कर्ज

आजच्या धावपळीच्या जगात आपल्याकडे स्वतःचं वाहन असेल तर आयुष्य सुखकर आणि सोयीस्कर होतं. म्हणून तर, वाहन हे आजच्या काळात केवळ एक प्रतिष्ठेचं साधन राहिलं नसून एक अत्यावश्यक गरज झाली आहे. कित्येक लोकांचा तर व्यवसाय आपल्या वाहनांवरच अवलंबून असतो, तर कित्येक आपलं स्वतःचं वाहन असावं असं स्वप्न पाहतात. मात्र अनेक आर्थिक अडचणी या स्वप्नांच्या आड येत असतात. शिवाय वाहन खरेदीसाठी मोठी रक्कम मोजावी लागते जी सहजासहजी आपल्या हाताशी नसते. पण आता श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटीच्या वाहन कर्ज योजनेंतर्गत वाहन कर्ज घ्या कमीत कमी व्याजदरात, शिवाय कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ कर्ज मंजुरी!
सज्ज व्हा आपले आयुष्य सुखकर आणि सोयीस्कर करण्यासाठी! वाहन कर्जाबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

कॅश क्रेडिट लोन

व्यवसाय म्हटला की चढ उतार आलेच, पण हे चढ उतार पार करण्याची जोखीम घेऊन ते सक्षमपणे पार करूनच एक यशस्वी व्यवसाय उभा करता येऊ शकतो. तुमच्या व्यवसाय वृद्धीसाठी आणि आर्थिक अडचणींच्या काळात श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी आहे तुमच्या पाठीशी. तुमच्या व्यवसायासाठी साथ देत आहे कॅश क्रेडिट लोन. आता आपलं समृद्ध व्यवसायाचं स्वप्न पूर्ण करा.
कॅश क्रेडिट लोन योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क शाखेला भेट द्या किंवा 1800 5322 811 वर कॉल करा.

Cash Credit Loan
Cash Credit Loan
Cash Credit Loan

अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्या किंवा संपर्क करा.