ठेव योजना

fixed deposit scheme

मुदत ठेव योजना (FD)

व्यवसाय असो अथवा नोकरी, अनेकदा पैसे येतात आणि मुठीतल्या वाळूसारखे हातातून कधी निघून जातात तेच कळत नाही. परिणामी, जमवलेली बचतही अशीच निघून जाते. म्हणूनच हे पैसे एका सुरक्षित ठिकाणी गुंतवून ठेवायला हवे आणि त्यासाठीच श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटीची मुदत ठेव योजना आहे आपल्या सेवेत; ज्यात रक्कम सुरक्षित राहते व आकर्षक व्याजही मिळते. आपली बचत नाहक खर्च होऊ नये यासाठी बचत ठराविक कालावधीसाठी मुदत ठेव म्हणून ठेवणे एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे!


तुमची बचत सुरक्षित ठेवणे आणि मुदत ठेवीवर जास्तीत जास्त परतावा देणे ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. आमच्या मुदत ठेव योजनेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.

ठेवीचा प्रकार नियमित व्याजदर
१ ते ३ महिने ५%
४ ते ६ महिने ६%
७ ते ११ महिने ७%
१२ महिने व त्यापुढील कालावधीसाठी १०%
दाम दुप्पट - ९६ महिने ९.०५%
दाम दीडपट ५४ महिने ९.५०%
दाम तिप्पट - १५६ महिने ८.८२%

ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, विधवा यांच्यासाठी ०.५०% अधिक व्याजदर

monthly plan

मासिक ठेव योजना

आज लावलेले झाड भविष्यात फळांसह सावलीही देते. पण त्या भविष्यातील आरामदायी जीवनासाठीचे बीज आजच पेरायला हवे, जेणेकरून वृद्धापकाळात निश्चिंत जीवनाचा आनंद घेता येईल आणि यासाठीच श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटीची मासिक ठेव योजना सर्वोत्तम ठरते.
एका ठराविक वयानंतर आपली सर्व कामं, जबाबदाऱ्या आणि धकाधकीच्या जीवनाला बाजूला सारून समाधानाने जगण्याची वेळ येते. या समाधानी जीवनात आर्थिक अडचणींमुळे व्यत्यय येऊ नये यासाठी आताच तरतूद करा, आमच्या मासिक ठेव योजनेमध्ये रु. १ लाखाच्या गुंतवणुकीवर प्रतिमहा आकर्षक व्याजदरासह परतावा मिळवा, ज्येष्ठ नागरिकांसाठी ०.५% अधिक व्याजदराचा फायदा.


निवृत्तीनंतर आनंद घ्या समाधानी जीवनाचा, मासिक ठेव योजनेच्या अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.





deposit scheme

आवर्तक ठेव योजना (RD)

व्यवसाय असो अथवा नोकरी, अनेकदा पैसे येतात आणि मुठीतल्या वाळूसारखे हातातून कधी निघून जातात तेच कळत नाही. परिणामी, जमवलेली बचतही अशीच निघून जाते. म्हणूनच हे पैसे एका सुरक्षित ठिकाणी गुंतवून ठेवायला हवे आणि त्यासाठीच श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटीची मुदत ठेव योजना आहे आपल्या सेवेत; ज्यात रक्कम सुरक्षित राहते व आकर्षक व्याजही मिळते. आपली बचत नाहक खर्च होऊ नये यासाठी बचत ठराविक कालावधीसाठी मुदत ठेव म्हणून ठेवणे एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे!


तुमची बचत सुरक्षित ठेवणे आणि मुदत ठेवीवर जास्तीत जास्त परतावा देणे ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. आमच्या मुदत ठेव योजनेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.

मुदत १२ महिने २४ महिने ३६ महिने ६० महिने
मासिक बचत मुदतीनंतर मिळणारी रक्कम
५०० ६२९३ १३२८३ २१५६२ ४०५९५
१००० १२५८५ २६५६५ ४३१२५ ८११८९
२००० २५१७० ५३१३० ८६२५० १६२३७९
३००० ३७७५५ ७६६९५ १२९३७५ २४३५६८
५००० ६२९२५ १३२८२५ २१५६२४ ४०५९४७
future plan

दाम दीडपट ठेव योजना

मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळकतही हवी मोठी! आज तुम्ही तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहात, त्यालाच जोड द्या आकर्षक व्याजदराची. आपल्या सेव्हींग्स श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटीच्या दाम दुप्पट योजनेत गुंतवा. जेणेकरून, ठराविक काळानंतर तुमची रक्कम होईल दुप्पट आणि तुमचं हवं ते स्वप्न पूर्ण होईल अपेक्षेपेक्षा लवकर!


आमच्या दाम दुप्पट योजनेंतर्गत ९६ महिन्यात तुम्ही गुंतवलेली रक्कम दुप्पट होऊन मिळते. उदा. तुम्ही रु. १ लाख गुंतवले तर ९६ महिन्यानंतर तुम्हाला रु. २ लाख मिळतात. मग आजच निर्णय घ्या, आपल्या स्वप्नांच्या दिशेनं पहिलं पाऊल उचला. दाम दुप्पट योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.

deposit scheme

शुभमंगल ठेव योजना

मुलांचं लग्न हे आई-वडिलांच्या आणि मुलांच्या आयुष्यातील एक महत्वाचा, अत्यानंदाचा व कायम लक्षात राहणारा क्षण असतो. त्यात कुठल्याही प्रकारची कमी राहू नये, कुणाच्याही इच्छा-आकांक्षांना तडा जाऊ नये, हा सोहळा कायम एक अविस्मरणीय सोहळा व्हावा यासाठी अनेक कुटुंब तत्परतेने झटत असतात, त्यासाठी मोठा खर्च देखील करावा लागतो. अशात आपल्या बचती, घरातील दागिने, वेळप्रसंगी घर आणि शेतीदेखील विकल्याची उदाहरणं आपल्या ऐकण्यात आली असतीलच, मात्र वेळीच निर्णय घेऊन लग्नासाठी आतापासूनच पूर्वतयारी केली तर कुठलीही अडचण न येता लग्नाचा आनंददायी सोहळा अगदी सहज पार पाडता येईल.


आता मुलांच्या लग्नकार्याची चिंता सोडा, श्री व्यंकटेश सोसाटीच्या शुभमंगल ठेव योजनेंतर्गत मुलाच्या/मुलीच्या जन्मानंतर रु.४५ हजार एक रकमी गुंतवले तर १५ वर्षानंतर तुम्हाला रु.२,६९,८११/- मिळतात. ही रक्कम आपल्यावरील आर्थिक भार खूप हलका करेल व तुमचे आनंदाचे क्षण कुठल्याही आर्थिक व्यत्ययाशिवाय आनंदाने पार पडतील. शुभमंगल ठेव योजनेच्या अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.

tripple deposit scheme

ट्रिपल डिपॉझिट योजना

तुम्ही जमलेली बचत जर योग्य ठिकाणी गुंतवली तर त्यातून तुम्हाला भरपूर फायदा मिळू शकतो, जशी की व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटीची ट्रिपल डिपॉझिट योजना; जिथे आपल्या गुंतवणुकीवर ठराविक काळानंतर मिळेल तीन पट फायदा! सुरक्षित आणि खात्रीशीर मिळकतीचा राजमार्ग, ट्रिपल डिपॉझिट योजना!


आमच्या या योजनेंतर्गत १५६ महिन्यांत तुम्ही गुंतवलेली रक्कम तीनपट मिळते. उदा. तुम्ही रु. १ लाख गुंतवले तर १५६ महिन्यांनंतर तुम्हाला रु. ३ लाख मिळतात. म्हणून वेळीच निर्णय घ्या, १५६ महिन्यांत आपली गुंतवणूक ट्रिपल करा. ट्रिपल डिपॉझिट योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.

deposit scheme

दाम दुप्पट योजना

मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळकतही हवी मोठी! आज तुम्ही तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहात, त्यालाच जोड द्या आकर्षक व्याजदराची. आपल्या सेविंग्स श्री व्यंकटेश मल्टिपर्पज सोसायटीच्या दाम दुप्पट योजनेत गुंतवा. जेणेकरून, ठराविक काळानंतर तुमची रक्कम होईल दुप्पट आणि तुमचं हवं ते स्वप्न पूर्ण होईल अपेक्षेपेक्षा लवकर!


आमच्या दाम दुप्पट योजनेंतर्गत ९६ महिन्यात तुम्ही गुंतवलेली रक्कम दुप्पट होऊन मिळते. उदा. तुम्ही रु. १ लाख गुंतवले तर ९६ महिन्यानंतर तुम्हाला रु. २ लाख मिळतात. मग आजच निर्णय घ्या, आपल्या स्वप्नांच्या दिशेनं पहिलं पाऊल उचला. दाम दुप्पट योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.

pigmy deposit

पिग्मी/ दैनंदिन ठेव योजना

आजच्या छोट्याशा गुंतवणुकीतून भविष्याची मोठी बचत तयार होते. म्हणूनच स्वतःला छोट्या छोट्या बचतीची सवय लावायला हवी. याच विचारातून आम्ही एक तरतूद केली आहे. रोजंदारीवर काम करणारे कामगार, लहानसहान व्यापारी आणि शेतकऱ्यांना बचतीची सवय लागावी तसेच त्यांच्या लग्न, घर खरेदी, वाहन खरेदी अशा मोठ्या भांडवली गरजा वेळीच भागवण्यासाठी मोठी रक्कम साठवली जावी. म्हणून श्री व्यंकटेश मल्टीस्टेटने पिग्मी अर्थात दैनंदिन ठेव योजना सुरू केली. या योजनेत रोजच्यारोज अगदी कमीत कमी रक्कम गुंतवून उद्या एकत्रितपणे एका मोठ्या रकमेचा तुम्ही लाभ घेऊ शकता.


छोट्या छोट्या बचतीतून पूर्ण करा स्वप्नांचा महासागर! पिग्मी / दैनंदिन ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.

deposit scheme

फ्युचर बिल्डर ठेव योजना

स्वप्नं कधीच संपत नाहीत. आज एक स्वप्न पूर्ण झालं की त्याहून मोठं स्वप्नं आपण पाहतो. कधी आजच्यासाठी तर कधी भविष्यासाठी कितीतरी गोष्टी करू असा विचार आपण करतो आणि स्वप्नं केवळ स्वप्नंच बनून राहतात. आजच्या गरजांसह भविष्यातील स्वप्नंही पूर्ण करता यावीत म्हणूनच सादर आहे श्री व्यंकटेश मल्टीस्टेटची 'फ्यूचर बिल्डर ठेव योजना.'


आता पूर्ण होतील सर्व स्वप्नं! फ्यूचर बिल्डर ठेव योजनेचा लाभ घ्या आणि भविष्यातील गरजांसाठी आत्तापासूनच बचत करा. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.

deposit scheme

महिला बचत गट ठेव योजना

दिवसेंदिवस महिला प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. केवळ शहरातच नाही तर खेड्यातील महिला देखील महिला बचत गटाच्या सहाय्याने एक यशस्वी व्यवसाय करीत आहेत. त्यांच्या व्यवसायाला आणखी सक्षम व सबळ करण्यासाठी श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी सादर करीत आहेत महिला बचत गट ठेव योजना. संस्थेच्या या योजनेत महिला बचत गटाची कामे सुरक्षित तर राहतीलच, शिवाय त्यावर उत्तम परतावा देखील मिळेल.


महिला बचत गट ठेव योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटीच्या शाखेला भेट द्या किंवा 1800 5322 811 वर कॉल करा.

अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्या किंवा संपर्क करा.