UPI Transaction Limit: युपीआयच्या मर्यादेमुळे त्रस्त आहात? मग अशी वाढवा मर्यादा..!

UPI Transaction Limit: युपीआयच्या मर्यादेमुळे त्रस्त आहात? मग अशी वाढवा मर्यादा..!
15 Feb, 2026 20 Views By Admin

UPI Transaction Limit: युपीआयच्या मर्यादेमुळे त्रस्त आहात? मग अशी वाढवा मर्यादा..!

आधी व्यवहार करायचं म्हटल्यावर पैशांशिवाय पर्याय नव्हता. मात्र, या डिजिटल युगात युपीआय (UPI - Unified Payments Interface) हे सर्वांत प्रभावी आणि लोकप्रिय माध्यम बनले आहे. त्यामुळे घरभाडे, शाळेची फी, तिकीट बुकिंग आणि शॉपिंग यासारख्याा कामांसाठी रोजच लाखो लोक युपीआयचा वापर करत आहेत. मात्र, अनेकदा मोठा व्यवहार करताना अचानक ॲपवर "Limit Exceeded" म्हणजेच मर्यादा ओलांडली असा मेसेज येतो. तेव्हा बऱ्याच जणांना याची जाणीव होते की, इथेही व्यवहाराची मर्यादा (Limit) आहे. त्यामुळे अनेकांना मोक्याची वेळी खाली पाहायची वेळ येते. म्हणून आज आपण मर्यादा कशी वाढवायची याविषयी सविस्तर जाणून घेऊया.. 

युपीआय मर्यादा  म्हणजे काय? 

बहुतेक बँकांमध्ये सामान्य ग्राहकांसाठी एका दिवसाची युपीआयची मर्यादा एक लाख रुपये असते. परंतु, ही मर्यादा फक्त ॲपवर अवलंबून नसते, तर ती तीन गोष्टींवर आधारित असते: NPCI चे नियम, तुमच्या बँकेची अंतर्गत मर्यादा आणि काही वेळा ऍप-लेव्हल नियंत्रणांना सामोरे जावे लागते. 
जास्त मर्यादा कधी मिळते? 

काही खास श्रेणींमध्ये, जसे की IPO अर्ज, टॅक्स पेमेंट, शाळा किंवा रुग्णालयाची फी आणि सरकारी व्यवहार यासाठी ही मर्यादा ₹2 लाख, ₹5 लाख किंवा त्यापेक्षाही अधिक असू शकते. मात्र, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमची बँक त्या विशिष्ट व्यवहारासाठी उच्च मर्यादा सक्षम  करते. 

मर्यादा का कमी होते? 

जर तुम्ही अलीकडेच नवीन बँक खाते युपीआयशी जोडले असेल, फोन बदलला असेल किंवा पहिल्यांदाच युपीआय सक्रिय केले असेल, तर बँक सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरती कमी मर्यादा निश्चित करू शकते. तसेच, अपूर्ण KYC मुळेही तुमची मर्यादा कमी होऊ शकते. लक्षात ठेवा की ही मर्यादा तुमच्या बँक खात्याशी संबंधित असते, ॲपशी नाही. म्हणजेच Google Pay, PhonePe आणि Paytm वर एकच खाते वापरल्याने तुमची एकूण मर्यादा वाढत नाही. 

मर्यादा कशी वाढवायची? 

  1. सर्वात आधी तुमच्या बँकेशी संपर्क साधा आणि सध्याच्या युपीआय मर्यादेची माहिती घ्या.
  2. जर तुमची KYC अपूर्ण असेल, तर ती पूर्ण करा.
  3. तुमचे पेमेंट एखाद्या 'उच्च-मर्यादा' प्रकारात (High-limit category) येते का ते तपासा.
  4. जर बँक मर्यादा वाढवत नसेल, तर काही पर्याय उपलब्ध आहेत: पेमेंट दोन दिवसांत विभागून करा.
  5. दुसरे बँक खाते वापरा किंवा मोठ्या व्यवहारांसाठी Net Banking/RTGS चा आधार घ्या.

कामाची गोष्ट 

युपीआय अत्यंत सोयीचे आहे. परंतु, ते प्रत्येक मोठ्या व्यवहारासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेलच असे नाही. योग्य माहिती आणि बँकेशी समन्वय राखून तुम्ही तुमची मर्यादा वाढवू शकता आणि तुमचे डिजिटल पेमेंट्स अधिक सोपे करू शकता.



अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्या किंवा संपर्क करा.