Saving Tips: लाइफस्टाइल तडजोड न करता जगायची आहे? मग या गोष्टी ध्यानात ठेवा..

Saving Tips: लाइफस्टाइल तडजोड न करता जगायची आहे? मग या गोष्टी ध्यानात ठेवा..
05 May, 2026 33 Views By Admin

Saving Tips: लाइफस्टाइल तडजोड न करता जगायची आहे? मग या गोष्टी ध्यानात ठेवा..

पैसे वाचवायचे म्हटलं की, अनेकांना असं वाटतं की आता आवडीच्या गोष्टी करायला मिळणार नाहीत. बाहेरचं खाणं बंद करावं लागेल, शॉपिंग कमी करावी लागेल किंवा फिरायला जाणं टाळावं लागेल. पण खरं पाहिलं तर बचत म्हणजे स्वतःला सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवणं नाही. थोडं नियोजन आणि काही स्मार्ट सवयी अंगीकारल्या तर लाइफस्टाइलमध्ये मोठा बदल न करता देखील चांगली बचत करता येते. तुम्हालाही बचत करायची आहे? मग चला कशी करायची ते समजून घेऊया..

खर्चाची नोंद ठेवा आणि बजेट तयार करा

पैसे बचत करण्याची सुरुवात आपल्या खर्चाच्या माहिती ठेवण्यापासून होते. महिन्याच्या शेवटी बँक स्टेटमेंट पाहून आश्चर्य वाटण्यापेक्षा सुरुवातीपासूनच पैसे कुठे खर्च होत आहेत, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्ही एखादं सोपं मोबाइल ॲप किंवा एक्सेल शीट वापरू शकता.

जेव्हा तुम्ही रोजच्या छोट्या खर्चांकडे लक्ष द्यायला लागता, तेव्हा अनेक गोष्टी लक्षात येतात. उदाहरणार्थ, रोजची कॉफी, वारंवार ऑनलाईन ऑर्डर करणे किंवा वापरात नसलेले सब्सक्रिप्शन यावरही खूप पैसे खर्च होतात. त्यामुळे कुठे खर्च कमी करता येईल हे सहज समजतं..

अनावश्यक सब्सक्रिप्शन बंद करा

आजकाल अनेकांकडे Netflix, Amazon Prime, Spotify यांसारखी अनेक सब्सक्रिप्शन असतात. काही आपण रोज वापरतो, तर काही महिनोन्‌महिने वापरात नसतात. पण त्यांचे पैसे मात्र दर महिन्याला खात्यातून जात राहतात. म्हणून एकदा सगळ्या सब्सक्रिप्शनची यादी तयार करा. जी वापरात नाहीत ती बंद करा. काही सेवा कुटुंबीय किंवा मित्रांसोबत शेअर करूनही खर्च कमी करता येतो.

बाहेर खाण्याची सवय कमी करा

दर आठवड्याला बाहेर जेवणं किंवा सतत फूड डिलिव्हरी मागवणं खिशावर ताण आणू शकतं. याचा अर्थ असा नाही की, बाहेर खाणं पूर्णपणे बंद करावं. पण महिन्यात चार वेळा बाहेर जात असाल तर ते दोन वेळांपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न करा. तसेच, आवडते पदार्थ घरी बनवायला शिकल्यास पैशांची मोठी बचत होते. यामुळे खर्च कमी होतोच, शिवाय अन्नाची गुणवत्ता आणि आरोग्य दोन्हीही चांगले राहतात.

स्मार्ट शॉपिंग करा

आजच्या काळात डिस्काउंट, कूपन आणि कॅशबॅकच्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी ऑनलाईन ऑफर तपासण्याची सवय लावा. योग्य पद्धतीने क्रेडिट कार्ड वापरल्यास कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉइंट्सचाही फायदा होऊ शकतो. तसेच, प्रत्येक वेळी महागड्या ब्रँडेड वस्तू घेण्यापेक्षा कधी कधी स्थानिक किंवा सामान्य ब्रँडचे पर्याय वापरून पाहा. अनेक वेळा गुणवत्ता जवळपास सारखीच असते, पण किंमत खूप कमी असते.

बचत ही सवय बनवा

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे बचत ही सवय बनवा, ओझं नाही. जसं दर महिन्याला वीज बिल किंवा घरभाडं भरलं जातं, तसंच ठराविक रक्कम नियमितपणे सेव्हिंग अकाउंटमध्ये जमा करा. नेट बँकिंगमध्ये ऑटो ट्रान्सफर सेट केल्यास हे आणखी सोपं होतं. एकदा बचत करण्याची सवय लागली की, तुम्हाला कोणत्याही गोष्टींचा त्याग केल्यासारखं वाटणार नाही. त्यातही व्यंकटेश मल्टीस्टेटमध्ये तुम्ही बचत खाते उघडून बचतीचा आरंभ केल्यास तुम्हाला आकर्षक व्याजदर तुम्ही मिळवू शकणार. तसेच, व्यंकटेशच्या बचत खात्याच्या अन्य सुविधांचा लाभही तुम्ही घेऊ शकणार.. याविषयी आणखी जाणून घेण्यासाठी तुम्ही 

मनोरंजन आणि छंदही ठेवा बजेटमध्ये 

पैसे वाचवणं म्हणजे चित्रपट, संगीत, प्रवास किंवा छंद सोडणं नाही. त्यासाठी स्मार्ट पर्याय निवडता येतात. उदाहरणार्थ, स्वस्त दरातील शोमध्ये चित्रपट पाहणे, स्थानिक कार्यक्रमांना भेट देणे किंवा मित्रांसोबत घरीच गेम नाईट आयोजित करणे. यामुळे खर्च कमी होतो आणि आनंदही तितकाच मिळतो.


पैसे वाचवण्याचा खरा अर्थ काटकसर नाही, तर समजूतदारपणा आहे. थोडं नियोजन आणि थोडी जागरूकता ठेवली तर लाइफस्टाइलमध्ये मोठा बदल न करता देखील चांगली बचत करता येते. कारण, छोटे छोटे बदल भविष्यात मोठी आर्थिक मदत ठरू शकतात.. म्हणून आजच  बचत खाते उघडण्यासाठी तुम्ही व्यंकटेश मल्टीस्टेटच्या 1800 5322 111 या क्रमांकावर काॅल करा किंवा जवळच्या शाखेला भेट द्या..

अस्वीकरण : या लेखातील माहिती व गुंतवणुकीसंदर्भातील मते ही फक्त  माहितीपर उद्देशाने असून, कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 



अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्या किंवा संपर्क करा.