जमीन की घर: गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय कोणता?

जमीन की घर: गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय कोणता?
16 Mar, 2026 16 Views By Admin

जमीन की घर: गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय कोणता?

 

भारतीय रिअल इस्टेट मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही मोठ्या शहरांमध्ये घर किंवा फ्लॅट खरेदी करू शकता किंवा विकसित होणाऱ्या भागात जमीन घेऊ शकता. मात्र, या दोन्ही पर्यायांचे फायदे आणि जोखीम आहेत. या संदर्भात काही तज्ज्ञांनी मनी कंट्रोलला माहिती दिली आहे.. यामध्ये ते म्हणतात, परतावा, लिक्विडिटी, टॅक्स आणि जोखमीचे स्वरूप समजून घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नये.. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊया.. 

कोणत्या गुंतवणुकीत जास्त पैसा वाढेल? 

निवासी मालमत्तेने (घर, फ्लॅट) दीर्घकाळात स्थिर वाढ दर्शविली आहे. 'फॉर्च्युन प्राइमरो'चे संचालक राहिल रेड्डी यांच्या मतानुसार, भारतातील मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किमती सातत्याने वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी ही वाढ महागाई दरापेक्षाही जास्त राहिली आहे. काही बाजारपेठांमध्ये गेल्या 10 वर्षांत किमती 100 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. त्यामुळे अनेकांचा निवासी मालमत्तेवर अधिक भर असतो. 

जमिनीच्या खरेदीसाठी लोकेशन महत्वाचे  

'द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा'चे सीईओ समुज्ज्वल घोष सांगतात की, धार्मिक आणि सांस्कृतिक शहरांमध्ये जमिनीची मागणी वाढली आहे. राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि महाकाल कॉरिडॉर यासारख्या मोठ्या प्रकल्पांनंतर तेथील किमती वेगाने वाढल्या आहेत. 

त्यांच्या मते, चांगल्या लोकेशनवरील जमीन अधिक वेगाने वाढते. जर जमीन दीर्घकालीन योजनेशी जोडलेली असेल, तर काळानुसार तिची किंमत मोठ्या प्रमाणात वाढू शकते. गेल्या पाच वर्षांत वृंदावनमध्ये सुमारे 29 टक्के आणि अयोध्येत 40 टक्क्यांहून अधिक CAGR नोंदवला गेला आहे. त्यामुळे जमीन खरेदी करताना लोकेशनवर फोकस करणं गरजेचं आहे.. 

लिक्विडिटी आणि विक्री सहज 

निवासी मालमत्ता विकणे सहसा सोपे असते, कारण खरेदीदारांची संख्या मोठी असते. शिवाय, बँक कर्जाची सुविधाही मिळते. राहिल रेड्डी यांच्या मते, निवासी मालमत्ता वेगाने विकली जाऊ शकते. कारण, संभाव्य खरेदीदार जास्त असतात. मात्र, जमिनीच्या बाबतीत खरेदीदार मर्यादित असू शकतात आणि कागदोपत्री मंजुरीची प्रक्रिया लांब असू शकते. समुज्ज्वल घोष म्हणतात की, आता ब्रँडेड आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित जमीन प्रकल्प, ज्यांचे टायटल क्लिअर आहे आणि पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. तिथे लिक्विडिटी पूर्वीपेक्षा अधिक चांगली आणि विश्वसनीय झाली आहे. 

कर आणि नियमांचा परिणाम 

जमीन आणि निवासी मालमत्ता दोन्हीवर 'लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स' लागू होतो. घोष सांगतात की, ज्या जमीन प्रकल्पांचे टायटल क्लिअर आहेत आणि नियामक मंजुरी पूर्ण आहे, तिथे व्यवहाराची जोखीम कमी असते. तर, RERA लागू झाल्यामुळे निवासी प्रकल्प अधिक पारदर्शक आणि सुव्यवस्थित झाले आहेत. ज्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. जमीन खरेदी करताना झोनिंग आणि एक्झिट प्लॅनवर लक्ष देणे गरजेचे आहे, असे राहिल रेड्डी सांगतात. तर निवासी मालमत्तेमध्ये अनुपालन, फायनान्सिंग आणि टॅक्स प्लॅनिंग तुलनेने अधिक स्पष्ट असते. 
 

जोखीम आणि परताव्याचा समतोल 

निवासी मालमत्ता त्वरित वापरासाठी घेता येते आणि त्यातून भाड्याचे उत्पन्नही मिळू शकते. मात्र, यामध्ये देखभालीचा खर्च असतो आणि काळानुसार इमारतीची झीज होते. दुसरीकडे, जमिनीतून नियमित उत्पन्न मिळत नाही, परंतु दीर्घकाळात किंमत वाढण्याची किंवा भविष्यात विकासाची मोठी शक्यता असते. घोष यांच्या मते, जमीन घेणं जोखमीचं नसते, पण कोणताही तपास न करता किंवा नियोजन नसलेले प्रकल्प जोखीम निर्माण करतात. योग्य ठिकाण आणि नियोजन असलेली जमीन दीर्घकाळात मोठी व्हॅल्यू निर्माण करू शकते.  

पोर्टफोलिओमध्ये समतोल कसा राखायचा? 

तज्ज्ञांच्या मते, निवासी मालमत्ता आणि जमीन या दोन्ही प्रकारच्या मालमत्तांचा समावेश करून एक संतुलित पोर्टफोलिओ तयार केला जाऊ शकतो. निवासी मालमत्ता स्थिर परतावा आणि भाड्याचे उत्पन्न देऊ शकते, तर विचारपूर्वक निवडलेली जमीन पायाभूत सुविधा किंवा धोरणात्मक बदलांमुळे मिळणाऱ्या तेजीचा फायदा देऊ शकते. याचबरोबर, गुंतवणुकदारांनी आपले उद्दिष्ट, गुंतवणुकीचा कालावधी आणि निवडलेल्या 'मायक्रो मार्केट'ची स्थिती लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा, जेणेकरून त्यांचा पोर्टफोलिओ मजबूत आणि सुरक्षित राहू शकेल.. 

कामाची गोष्ट.. 

आता तुम्हाला घर की जमीन याविषयी बऱ्यापैकी गोष्टी माहिती झाल्या आहेत. त्यामुळ गुंतवणूक करण्याआधी तुमची गरज ओळखा. कारण, दोन्ही गोष्टी घेताना मोठा पैसा गुंतवावा लागतो.. त्यामुळे पूर्ण नियोजन करूनच गुंतवणूक करणं गरजेचं आहे. मात्र, तुम्हाला खरंच गुंतवणूक करायची  आहे. पण,  पैशांची अडचण आहे.. तर निसंकोच  व्यंकटेश मल्टीस्टेटच्या लोन सेवांचा लाभ घ्यायला विसरू नका.. तसेच, अधिक माहितीसाठी काॅल करा 1800 5322 111 किंवा जवळच्या शाखेला भेट द्या..



अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्या किंवा संपर्क करा.