मुलीच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन कसं असावं? जाणून घ्या योग्य गुंतवणुकीचा फॉर्म्यूला

मुलीच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन कसं असावं? जाणून घ्या योग्य गुंतवणुकीचा फॉर्म्यूला
10 Apr, 2026 17 Views By Admin

मुलीच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन कसं असावं? जाणून घ्या योग्य गुंतवणुकीचा फॉर्म्यूला

मुलीच्या नावाने गुंतवणूक करायची म्हटलं की, काही सरकारी योजनेत पैसे गुंतवले की काम व्हायचं.. पण, आता एका योजनेत किंवा प्रॉडक्टमध्ये पैसे गुंतवणे मर्यादित राहिलेले नाही. आजच्या काळात पालकांचा दृष्टिकोन बदलत आहे. आता उद्दिष्ट फक्त पैसा साठवणे नसून, शिक्षण, करिअरची निवड आणि दीर्घकालीन आर्थिक स्वावलंबनासाठी उपयुक्त ठरेल असे सक्षम इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ तयार करणे अधिक महत्त्वाचे ठरत आहे.. तुम्हालाही तुमच्या मुलीसाठी पोर्टफोलिओ तयार करायचा आहे?? चला तर मग अधिक जाणून घेऊया.. 

फक्त सुरक्षितता नव्हे, तर सुलभताही तितकीच महत्त्वाची

आधीपासूनच आपण गुंतवणूक म्हटलं की, सुरक्षित पर्याय पाहतो.. त्यामुळे सरकारी योजनांवर आपला अधिक फोकस राहतो. यात ‘सुकन्या समृद्धी योजना’ (SSY) सारख्या सरकारी योजना बचत आणि करसवलतीच्या दृष्टीने आजही उत्तम मानल्या जातात. मात्र, या योजनेतील लॉक-इन कालावधी हा तिचा मोठा मर्यादित भाग ठरू शकतो.

SSY मध्ये गुंतवलेले पैसे दीर्घकाळासाठी अडकून राहतात. पण अनेकदा शिक्षण किंवा इतर आवश्यक खर्चांसाठी वेळेआधी पैशांची गरज भासू शकते. अशा वेळी या योजनेतील रक्कम सहज उपयोगी पडत नाही. म्हणूनच आजचे वित्तीय सल्लागार सुकन्या समृद्धी योजनेकडे संपूर्ण नियोजनाचा एक भाग म्हणून पाहण्याचा सल्ला देतात; एकमेव पर्याय म्हणून नव्हे.

उच्च शिक्षण हा सर्वांत मोठा खर्च ठरत आहे

मुलीच्या भविष्यासाठी नियोजन करताना उच्च शिक्षण हा सर्वांत मोठा खर्च ठरत आहे. मग तुम्ही तिला भारतात शिकवणार असो किंवा परदेशात, या खर्चात प्रचंड फरक असू शकतो. विशेषतः आंतरराष्ट्रीय पदवी अभ्यासक्रम आणि खासगी महाविद्यालयांच्या फीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

अशा परिस्थितीत केवळ निश्चित परतावा देणाऱ्या योजनांवर अवलंबून राहणे पुरेसे ठरणार नाही. यासाठी म्युच्युअल फंड हा एक प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत आहे. विशेषतः SIP च्या माध्यमातून इक्विटी म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास महागाईवर मात करत चांगली वाढ मिळू शकते. हा पर्याय तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सातत्यपूर्ण वाढ राखण्यास मदत करू शकतो.

फक्त कॉलेज शिक्षणच अंतिम उद्दिष्ट नाही

मुलीच्या भविष्यासाठी नियोजन करताना फक्त कॉलेज शिक्षणापुरतेच विचार करणे पुरेसे नाही. पदवी पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षण, स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करणे, किंवा पहिल्या घरासाठीचं डाउन पेमेंट अशा अनेक गरजा अचानक समोर येऊ शकतात. जर तुमचे सर्व पैसे एखाद्या दीर्घकालीन योजनेतच अडकलेले असतील, तर अशा गरजांसाठी तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे गुंतवणुकीचा काही भाग असा ठेवणे आवश्यक आहे, जो गरज पडल्यास सहज उपलब्ध होऊ शकेल.


विमा देखील तितकाच आवश्यक आहे

अनेकदा पालक गुंतवणूक करतात, मात्र, विमा या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. प्रत्येक पालकाकडे पुरेशा संरक्षणाची टर्म इन्शुरन्स पॉलिसी असणे गरजेचे आहे. यामुळे, अनपेक्षित परिस्थितीत पालकांपैकी कुणाला काही झाले तरी मुलीच्या भविष्यासाठी ठरवलेली आर्थिक उद्दिष्टे अपूर्ण राहणार नाहीत. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, विमा हा गुंतवणुकीचा पर्याय नसून एक मजबूत आर्थिक सुरक्षा कवच आहे.

काळानुसार आर्थिक नियोजनात बदल करणेही गरजेचे

आज पालकांच्या विचारसरणीत एक महत्त्वाचा बदल दिसून येतो. पूर्वी फक्त एक मोठी रक्कम जमा करून ती मुलीच्या हाती देण्याचा विचार केला जात असे. मात्र, आता  तिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यावर अधिक भर दिला जात आहे. मुलांशी बचत, गुंतवणूक आणि पैशांच्या व्यवस्थापनाबाबत वेळोवेळी संवाद साधणे आवश्यक आहे. त्यांना हळूहळू आर्थिक निर्णयांमध्ये सहभागी करून घेतल्यास पैशांविषयीची समज आणि जबाबदारीची जाणीव त्यांच्यात लहानपणापासूनच विकसित होते.

योजना तयार करा… पण तिचा वेळोवेळी आढावाही घ्या

आज तयार केलेली कोणतीही आर्थिक योजना पुढील 10 ते 15 वर्षे जशीच्या तशी उपयुक्त राहीलच असे नाही. शिक्षणाचे पर्याय, करिअरचे मार्ग आणि आयुष्यातील प्राधान्यक्रम काळानुसार बदलू शकतात. म्हणूनच, आपल्या आर्थिक योजनेचा वेळोवेळी आढावा घेणे आणि गरजेनुसार त्यात बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य नियोजन, सुलभता आणि सुरक्षितता यांचा समतोल साधला, तरच मुलीच्या भविष्यासाठी एक भक्कम आणि विश्वासार्ह आर्थिक पाया उभारता येईल.

कामाची गोष्ट

तुम्हाला पोर्टफोलिओ मजबूत करायचा असल्यास एका ठिकाणी गुंतवणूक करून चालणार नाही, हे तुमच्या लक्षात आलेच असेल. त्यामुळे प्रमाणित आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणूक केल्यास तुम्ही अधिक फायद्यात राहू शकता.. तसेच, तुमच्या गरजेनुसार तुम्ही मुलांसाठी व्यंकटेश मल्टीस्टेटमधील  मुदत ठेव, डिजिटल SIP आणि फ्युचर बाॅक्सच्या योजनांचा लाभ घेऊ शकता.. अधिक माहितीसाठी काॅल करा 1800 5322 111 किंवा जवळच्या शाखेला भेट द्या.. 

अस्वीकरण : या लेखातील माहिती व गुंतवणुकीसंदर्भातील मते ही फक्त  माहितीपर उद्देशाने असून, कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.



अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्या किंवा संपर्क करा.