भारतामध्ये पर्सनल फायनान्सच्या क्षेत्रात एक सर्वसाधारण समज आहे की, जर तुमचा क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक असेल, तर कर्ज सहज मिळते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती थोडी वेगळी आहे. अलीकडील अनेक प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की, चांगला क्रेडिट स्कोअर असतानाही काही लोकांना बँका आणि NBFC कडून कर्ज नाकारले गेले आहे. त्यामुळे अनेकांना या गोष्टीचे आश्चर्य वाटेल.. कारण, बहुतेकांना वाटते की, कर्ज मिळण्यासाठी क्रेडिट स्कोअरच सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. तज्ज्ञांच्या मते, क्रेडिट स्कोअर हा केवळ एक निकष आहे. कर्ज मंजूर करताना बँका इतर अनेक बाबींचाही विचार करतात. चला तर मग त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया..
कर्ज घेताना अनेकांना क्रेडिट स्कोअरवरच कर्ज मिळत असं वाटत. मात्र, ते तसे नाही. यामध्ये आणखीही गोष्टी पाहिल्या जातात..
जर तुमचे उत्पन्न स्थिर नसेल किंवा तुम्ही वारंवार नोकरी बदलत असाल, तर बँक तुम्हाला जोखमीचा ग्राहक मानू शकते.
जर आधीच तुमच्यावर अनेक कर्जे किंवा क्रेडिट कार्डची थकबाकी असेल, तर नवीन कर्ज मिळण्याची शक्यता कमी होते.
वेगवेगळ्या बँकांमध्ये सतत कर्जासाठी अर्ज केल्यास तुमची आर्थिक प्रोफाईल कमकुवत दिसू शकते.
प्रत्येक बँकेची स्वतःची जोखीम व्यवस्थापनाची धोरणे असतात. कधी कधी पोर्टफोलिओ संतुलित ठेवण्यासाठीही चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या अर्जदारांचे अर्ज नाकारले जाऊ शकतात.
रिपोर्टनुसार, काही वेळा प्रोफाईल मिसमॅचदेखील कर्ज नाकारण्याचे कारण ठरते. उदाहरणार्थ, तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असला तरी तुमचे उत्पन्न मागितलेल्या कर्जाच्या रकमेपुरते पुरेसे नसल्यास बँक अर्ज फेटाळू शकते.
याशिवाय अपूर्ण कागदपत्रे, चुकीची माहिती किंवा पूर्वीचे डिफॉल्ट्सदेखील कर्ज नाकारण्यास कारणीभूत ठरू शकतात. जरी तुम्ही नंतर ती स्थिती सुधारली असली तरी बँका तुमचा संपूर्ण क्रेडिट इतिहास तपासतात.
म्हणूनच, चांगला क्रेडिट स्कोअर असणे महत्त्वाचे आहे, पण तो कर्ज मंजुरीची हमी देत नाही. बँका आणि NBFC तुमचे उत्पन्न, नोकरीची स्थिरता, विद्यमान कर्जे आणि त्यांच्या अंतर्गत धोरणांचा विचार करूनच अंतिम निर्णय घेतात. त्यामुळे कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी केवळ स्कोअरवर अवलंबून न राहता आपली संपूर्ण आर्थिक प्रोफाईल मजबूत करणे आवश्यक आहे.
चांगला क्रेडिट स्कोअर असणंही चांगलीच गोष्ट आहे. पण, त्याचबरोबर ज्या गोष्टीसाठी आपण कर्ज काढणार आहोत. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आपण पू्र्ण करत आहोत, याची खात्री करणंही गरजेची आहे. त्यामुळे कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवायला विसरू नका. शिवाय झटपट कर्ज हवं असल्यास व्यंकटेश मल्टीस्टेटच्या जवळच्या शाखेला भेट द्या.. किंवा 1800-5322-111 वर संपर्क साधा..