Business Idea: दरवर्षी चालणारा हा ‘सिक्रेट’ बिझनेस तुम्हाला माहित आहे का?

Business Idea: दरवर्षी चालणारा हा ‘सिक्रेट’ बिझनेस तुम्हाला माहित आहे का?
30 Apr, 2026 19 Views By Admin

Business Idea: दरवर्षी चालणारा हा ‘सिक्रेट’ बिझनेस तुम्हाला माहित आहे का?

स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायाच विचार करत आहात?? तर मग एप्रिल महिना तुमच्यासाठी उत्तम संधी घेऊन आला आहे. कारण, एप्रिल म्हणजे नवीन आर्थिक वर्षाचा आरंभ.. याचवेळेस शाळा-कॉलेजांचं नवीन शैक्षणिक सत्रही सुरू होतं. त्यामुळे बाजारात अनेक उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढते, विशेषतः शिक्षणाशी संबंधित वस्तूंची. यामुळे या काळात शिक्षणाशी संबंधित व्यवसाय सुरू केल्यास चांगला नफा कमवता येऊ शकतो. मात्र, अनेक लोक अशा संधींकडे दुर्लक्ष करतात. मात्र, योग्य नियोजन आणि समजूतदारपणे काम केल्यास कमी गुंतवणुकीतही भक्कम व्यवसाय उभा करता येतो. विशेष म्हणजे काही व्यवसायांची मागणी दरवर्षी कायम असते, त्यामुळे धोका कमी राहतो आणि चांगली कमाई करता येते.. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया..

मागणी कधी असते ?

बहुतांश शाळा एप्रिलमध्येच सुरू होतात.. तर काही शाळा जून-जुलै मध्ये सुरू होतात..  शाळा-कॉलेज सुरू होताच नोटबुक, रेकॉर्ड बुक आणि नोटपॅड यांची मागणी अचानक वाढते. त्यामुळे बाजारात पुरवठा करणाऱ्यांची मोठी गरज निर्माण होते.

हा व्यवसाय कसा सुरू करावा?

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या फर्मची नोंदणी करावी लागेल, जी आता ऑनलाईन सोप्या पद्धतीने करता येते. त्यानंतर आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करून उत्पादन सुरू करता येते.

सुरुवातीचा खर्च किती येतो?

या व्यवसायासाठी किमान ४ लाख रुपये आवश्यक असतात. याशिवाय, मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊन सुमारे १६.५ लाख रुपयांचा प्रकल्प तुम्हाला उभारता येतो.

यंत्रसामग्री व सेटअप खर्च

पेपर कटिंग मशीन, बाइंडिंग मशीन, नंबरिंग मशीन आणि इतर उपकरणांसाठी सुमारे ३.९ लाख रुपये खर्च येतो. याशिवाय फर्निचर आणि कच्चा माल यासाठीही गुंतवणूक करावी लागते.

वार्षिक उत्पादन क्षमता

योग्य नियोजन केल्यास वर्षभरात सुमारे २ लाख नोटबुक, ४० हजार रेकॉर्ड बुक आणि ४० हजार नोटपॅड तयार करता येतात.

कमाईचा अंदाज

व्यवसाय योग्य पद्धतीने चालल्यास पहिल्याच वर्षात सुमारे ७.२ लाख रुपयांपर्यंत नफा मिळू शकतो. पुढील काळात गुंतवणूक आणि उत्पन्न दोन्ही वाढत जातात.

हा कमी जोखमीचा व्यवसाय आहे?

नोटबुकसारख्या वस्तूंची मागणी दरवर्षी कायम असते, त्यामुळे तोटा होण्याची शक्यता कमी असते. योग्य नेटवर्क आणि योग्य वेळ साधल्यास हा व्यवसाय स्थिर आणि चांगली कमाई करून देऊ शकतो.

कामाची गोष्ट

व्यवसाय म्हटल्यावर संयम आला. तो जर योग्य पद्धतीने सांभाळून सावध पावलं टाकली की, यशाचा रस्ता आपोआप मिळतो. मात्र, अनेकांना आर्थिक अडचणींनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे काही जणांना व्यवसाय सुरू करायच्या आधीच थांबावं लागतं, अशा नागरिकांना व्यंकटेश मल्टीस्टेट नक्कीच आर्थिक हातभार लावणार.. तुम्हाला व्यवसाय थाटायला झटपट कर्ज हवं असल्यास व्यंकटेश मल्टीस्टेटच्या जवळच्या शाखेला भेट द्या.. किंवा  1800-5322-111 वर संपर्क साधा..



अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्या किंवा संपर्क करा.