डिजिटल पिग्मी खाते म्हणजे काय ?
आमचे डिजिटल पिग्मी खाते तुम्हाला मोबाइल ॲप किंवा ऑनलाइन बँकिंग प्लॅटफॉर्म सारख्या डिजिटल चॅनेल मार्फ़त नियमितपणे लहान-मोठ्या रकमेची बचत करण्या करीता मदत करते. यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची किंवा कुठलीही डायरी मेंटेन करण्याची गरज नाही, डिजिटली काही क्लिक मध्ये तुमचे पिग्मी खाते सुरु होईल.
व्यावसायिक असो किंवा नोकरदार, गृहिणी असो किंवा उद्योजक हे खाते कुणीही सहज सुरु करू शकतं. हे डिजिटल पिग्मी खाते तुमच्या कौटुंबिक किंवा व्यावसायिक गरजा, लग्नसोहळा किंवा आपातकालीन परिस्थितीत मोठे उपयोगात येते, आणि तुम्हाला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवते.
अनलॉक करा डिजिटल पिग्मीचे असंख्य फायदे...
आमचे डिजिटल पिग्मी खाते म्हणजे नियमित बचत, आकर्षक परतावा आणि सुरक्षित व्यवहार! एक छोटीशी सुरुवात करून, तुमचे व तुमच्या प्रियजनांचे आर्थिक भविष्य सक्षम करा.

नियमित बचत
तुमच्या सोयीप्रमाणे पैसे भरण्याची वेळ ठरवून घ्या आणि गरजेनुसार थोड्या-थोड्या पैशांची बचत करा.

सुलभ व्यवस्थापन
आमचे मोबाइल ॲप किंवा ऑनलाइन बँकिंग द्वारे तुमचे खाते कधीही, कुठूनही व्यवस्थापित करा.

आकर्षक व्याजदर
डिजिटल पिग्मीसह 6 महिन्याला 3% आणि वार्षिक 6% इतका आकर्षक व्याजदर मिळवा.

सुरक्षित व्यवहार
आमच्या Robust security measures सह सुरक्षित व्यवहारांचा आनंद घ्या.
आजपासूनच स्मार्ट बचतीला सुरुवात करा
आमच्या डिजिटल पिग्मी खात्याच्या सुविधा आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी, स्मार्ट निर्णय घ्या आणि आजच बचतीला सुरुवात करा.

चार सोप्या स्टेप्समध्ये पिग्मी खाते सुरु करा.

पॅन आणि आधारद्वारे पडताळणी करा

तुमची माहिती भरा

तुमची के.वाय.सी. पूर्ण करा

तुमच्या खात्यात रक्कम भरा
